पाटेकुरा गावात बस थांबविण्याकरिता नागरिकांनी आंदोलन करीत बस चालकांना केली बस थांबविण्याची विनंती आगाराने दिली परवानगी
सडक अर्जुनी तालुक्यातील
गोंदिया कोहमारा राज्य महामार्गावर असलेल्या पाटेकुरा गावात एस टी बस चा थांबा देण्यात यावा यासाठी परिसरातील पाच गावातील लोकांनाही रस्त्यावर येत बस चालकांना बस थांब्यांचा पत्र दाखवत बस थांबविण्याची विनंती केली आहे तर गोंदिया आगार प्रमुखांनी देखील आंदोलकांची दखल घेत बस थांबायला मंजूरी दिली आहे.
गोंदिया कोहमारा मार्गावर पाटेकुरा गाव असून या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बस स्थानक देखील बांधण्यात आले मात्र एस टी बस या ठिकाणी थांबत नसल्याने परिसरातील पाच गावातील लोकांना पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या डव्वा गावात थांबून पाटेकुरा गावात यावा लागतो सोबतच गावातील शालेय विद्यार्थ्यांनची मानव विकास योजनेची बस सुटली तर विद्यार्थ्यांना देखील लिफ्ट घेत किंवा काळी पिवळी वाहनाने प्रवेश करून शाळेत जावा लागतो या संदर्भात पाच गावातील सरपंचानी वर्ष २०२३ मध्ये आगार प्रमुख गोंदिया याना पत्र दिला असता बस थांबायला परवानगी मिळाली तसा आदेश देखील चालकांना मिळाला मात्र तरी देखील बस थांबत नसल्याने नागरिकांनी आज रस्त्यावरून जाणाऱ्या एस टी बस चालकांना आगार प्रमुखांचा पत्र दाखवत बस थांबविण्याची विनंती केली तर या पुढे नियमित बस थांबली नाही तर तीव्र आंदोलन करू अशा इशारा गावकर्यांनी दिला आहे .
तर या पुढे पाटेकुरा गावात नियमित बस थांबेल अश्या सूचना आगर प्रमुखांनी बस चालकांना आणि वाहकांना दिल्या आहेत त्यामुळे पाटेकुरा गावात नियमित बस थांबल्या तर शाळकरी विद्यार्थ्यांसह इत्तर नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागणार नाही
