रोडाचे बांधकामात वनविभागाची दुहेरी वागणूक; आर्थिक देवाणघेवाण करा, नि काम करा.

करोबार मनोरंजन महाराष्ट्र

रोडाचे बांधकामात वनविभागाची दुहेरी वागणूक; आर्थिक देवाणघेवाण करा, नि काम करा.

सडकअर्जुनी:–अर्जुनी मोरगाव तालुक्यात बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या रस्त्याची दुरवस्था लक्षात घेता या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला वाव मिळत असल्याचे निदर्शनास येते.खडीकरण,पॅचेश, डांबरीकरणच्या नावाखाली गरज असल्या ठिकाणी व ज्या मार्गावर वाहतूकीची वर्दळ असते,अशा ठिकाणी रोडाकडे लोकप्रतिनिधी लक्ष न देता व रोड न बनविता आपल्या फायद्यासाठी आपले संबंधित हितसंबंध असलेल्या कंत्राटदाराला काम देऊन आपला व संबंधितांचा खिसा गरम करीत आहेत.यामुळेच केलेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे होऊन तेच काम दुरुस्तीच्या नावाखाली वर्षभर चालू असतात.रोडाचे खड्ड्यांचे,तर कधी माती व भिस तर कधी मुरुमाची झालर,तर कधी पॅचेश च्या माध्यमातून डांबर ओतून अर्धवट खड्डे भरले जातात.तेच काम५-६महिन्यानंतर कामाच्या नावात फेरबदल करून डांबरी रस्ता, रस्ता रुंदीकरणाची कामे केली जातात.याचे गणित मांडणे कठीण आहे.तालुक्यात अर्जुनी मोरगाव,कैरी,सुकळी ते कालीमाती गोठणगाव मार्ग क्र.रा.म.३५४ या मार्गावर मागिल एक वर्षापासून पहिल्यांदा पॅचेश,सिलकोड,चुरी व त्याच रोडावर मागिल तीन महिन्यांपासून खैरी ते सुकळी कवठा टी-पाईंट ते गोठणगाव पाच किमी.वर नाली बांधकाम सुरू असून कालीमाती, प्रतापगड टी-पाईंट पर्यंत नाली बांधकाम मध्ये रोडाचे दोन्ही कडेला ३-३ मीटर पूर्वी बनविलेली जुनी नाली काढून त्याच जागेवर तेवढीच नाली बनवित आहेत.पण प्रतापगड टी -पाईंट वरुन तीन किमी.गोठणगाव जाणाऱ्या मार्गावर पाच नाली बांधकाम सुरू असून रोडाचे दोन्ही कडेला ५-५ मीटर नाली बनवित आहेत.त्यामध्ये वनविभागाच्या जंगल सरहद्द च्या आत झाडे कापून नाली बनविली जात आहे.त्याकडे वनविभागाने दुर्लक्ष केले असून आंधळे झाले आहेत.पण दुसरीकडे हेच वनविभाग वनकायदा समोर करुन मागिल सात वर्षांपासून कोहलगांव ते गोठणगांव या रोडाचे सात किमी.अंतरामध्ये ८-१० नालीचे बांधकाम रोडाचे दोन्ही कडेला पाच मीटर बनवित असल्याने ते काम बंद केले गेले ‌वास्तविक कोहलगांव ते गोठणगांव हा मार्ग नवेगावबांध ते केशोरी,राजोली,भरनोली,कुरखेडा ६० वर्षांपासून रहदारीचा मार्ग असून हा मार्ग डांबरीकरणाचा आहे.त्यावेळेस गोठणगाव ते खैरी, सुकळी,कालीमाती हा मार्ग बैलबंडीचा होता.पण नवेगावबांध, गोठणगाव या रोडाचे रूंदीकरण व नाली बांधकाम वनविभागाचे अधिका-यांना आर्थिक देवाणघेवाण न झाल्याने हे काम सुरू होऊ शकले नाही.अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे ‌.त्यातच ज्याठिकाणी प्रतापगड टी-पाईंट ते गोठणगाव बनवित असलेल्या नाली बांधकामात मोठमोठे सागवान व ईतर झाडे कंत्राटदाराने लंपास केले.त्यामध्ये वनविभागासोबत आर्थिक देवाणघेवाण झाल्याने हे काम सुरू आहे.असे खाजगीत कंत्राटदार सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *