देवरी-सिरपूर/बांध येथील आर.टी.ओ. चेकपोस्टवरील सहा.आर.टी.ओ. खैरनार एसीबीच्या जाळ्यात

अपराध करियर महाराष्ट्र

देवरी-सिरपूर/बांध येथील आर.टी.ओ. चेकपोस्टवरील सहा.आर.टी.ओ. खैरनार एसीबीच्या जाळ्यात
===================
■ आर.टी.ओ. चेकपोस्ट नाक्यावर कार्यरत सहा.परिवहन अधिकारी श्री खैरनार यांना नाशिक येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेतांना रंगेहाथ पकडल्याची घटना.
—————————-
देवरी,ता.११ः गोंदिया जिल्ह्यातून जाणा-या मुंबई-कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ येथील मध्यप्रदेश व महाराष्ट्र सीमेवरील देवरी -सिरपूर/बांध आर.टी.ओ. चेकपोस्ट नाक्यावर कार्यरत सहा.परिवहन अधिकारी श्री खैरनार यांना नाशिक येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेतांना रंगेहाथ पकडल्याची घटना आज शुक्रवार (ता.११ एप्रिल) रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार देवरी-सिरपूर /बांध येथील आर.टी. ओ.चेकपोस्टवर अवैधरित्या वाहनचालकाकडून वसुली केली जात असल्याची तक्रार अनेक वाहनचालकांनी केलेली होती,त्यानुसार एका ट्रेलरच्या वाहनचालकाला आपल्या वाहनात बसवून नाशिक एसीबीचे अधिकारी ट्रेलरचे वाहनचालक म्हणून चढले आणि चेकपोस्टवर पोचताच पैशाची मागणी झाली असता पैसे भरण्याकरीता कार्यालयातील खिडकीजवळ असलेल्या काऊंटरवर जाऊन पैसे देत असताना कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे.
या कारवाईत सहा.परिवहन अधिकारी खैरनार यांच्यासोबत इतर दोघांनाही ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
सदर सहा.परिवहन अधिकार्याला देवरी पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले असून पुढची कारवाई अजून ही सुरु असल्याची माहिती आहे.#

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *