आता कृत्रिम बुद्धिमत्तेसह (AI) नवीन MS-CIT कोर्स!
सडक अर्जुनी=
गेल्या दोन दशकांत तब्बल 1.65 कोटीहून अधिक विद्यार्थ्यानी MS-CIT कोर्स अनुभवलेला आहे. आयटी क्षेत्रातील पायाभूत ज्ञान देणारा सर्वोत्तम कोर्स म्हणून या कोर्सची ओळख आहे. महाराष्ट्रा व्यतिरिक्त भारतातील अनेक राज्यात देखील महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे तत्सम कोर्सेस चालवले जातात.
गेल्या दोन दशकात भारतात समाजाच्या विविध स्तरांमध्ये Digital Divide हे एक मोठे आव्हान म्हणून समोर आले होते. या तफावतीची दखल घेत समाजातील अनेक घटकांनी त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न केले. विशेषतः MKCL ने MS-CIT या अत्यंत लोकप्रिय कोर्सच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शहरी तसेच ग्रामीण भागात माहिती तंत्रज्ञानाची पोहोच वाढवून डिजिटल साक्षरतेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. MKCL च्या महाराष्ट्रभर पसरलेल्या 4500 हून अधिक अधिकृत अध्ययन केंद्रांद्वारे (ALCs) या उद्दिष्टाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.
मात्र, आता Digital Divide कमी होत असतानाच AI जाणणारे आणि न जाणणारे अशी दरी निर्माण होत आहे. या AI Divideच्या नव्या आव्हानाचा उगम दिसून येत आहे. विविध माध्यमांमधून AI संदर्भातील बातम्या, विशेषतः नोकऱ्यांवरील संभाव्य परिणामांविषयी प्रसारित होणारी माहिती, सर्व समाजात भीती निर्माण करत आहे. “AI मुळे रोजगार संधी नष्ट होतील का?” असा प्रश्न अनेकांच्या मनात घर करून आहे.
या पार्श्वभूमीवर, AI Divide कमी करण्यासाठी MKCL पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. MS-CIT कोर्समध्ये आता 100 पेक्षा अधिक उपयोगी AI टूल्स ची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. यासोबतच, 400 हून अधिक स्किल्स विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, जेणेकरून ते AI च्या युगात विद्यार्थी आत्मविश्वासाने उभे राहू शकतील. MS Office मध्ये सुद्धा AI चा वापर आता कसं करता येतो हे ही शिकवले जाते.
शालेय विद्यार्थी, कॉलेजमधील तरुण तसेच समाजातील इतर सर्व घटक—या सर्वांसाठी AI टूल्सचा वापर दैनंदिन जीवनात कसा करता येईल याची माहिती MS-CIT कोर्समध्ये दिली जात आहे. शहरांपासून ते ग्रामीण भागांपर्यंत, AI Divide दूर करण्याचा व्यापक उपक्रम या निमित्ताने MKCL च्या नेटवर्कद्वारे हाती घेण्यात आला आहे.
डिजिटल युगात संगणक आणि तंत्रज्ञान हे केवळ कॉर्पोरेट क्षेत्रापुरते मर्यादित न राहता, आता प्रत्येक विद्यार्थी, पालक आणि नागरिकासाठी अत्यावश्यक बनले आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL) ने पारंपरिक MS-CIT कोर्सला अधिक अद्ययावत करून नवीन MS-CIT – AI Powered कोर्सची रचना केली आहे. MS-CIT कोर्स केवळ Windows, Word, Excel, PowerPoint आणि इंटरनेटच्या वापरापुरता मर्यादित नाही, तर यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सायबर सुरक्षा, डेटा विश्लेषण आणि क्लाउड कंप्युटिंग यांसारख्या नवयुगातील कौशल्यांचा समावेश करण्यात आला आहे.
MS-CIT कोर्सची वैशिष्ट्ये:
• कृत्रिम बुद्धिमत्ता (AI):
AI म्हणजे संगणकांना मानवासारखे विचार करण्याची, शिकण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता देणारी तंत्रज्ञान प्रणाली. या कोर्समध्ये, विद्यार्थी ChatGPT, Google Gemini, Microsoft Copilot, Grok AI यांसारख्या AI टूल्सचा वापर करून सर्जनशील कामे कशी करावी, अभ्यासात मदत कशी घ्यावी आणि रोजच्या जीवनात AI कसे उपयोगी ठरते, हे शिकतील. यामुळे त्यांना आधुनिक जगात टिकून राहण्यासाठी आवश्यक कौशल्ये मिळतील.
• सायबर सुरक्षा (Cyber Security):
आजकाल ऑनलाइन फसवणुकीची शक्यता वाढली आहे. या कोर्समध्ये इंटरनेट सुरक्षितपणे वापरण्याचे नियम, पासवर्ड संरक्षण, फिशिंगपासून बचाव, सोशल मीडियावर सुरक्षिततेची काळजी कशी घ्यावी याचे सखोल मार्गदर्शन दिले जाते.
• डेटा विश्लेषण व डेटा साक्षरता:
डेटा म्हणजे माहिती आणि योग्य माहितीचा उपयोग केला, तर ती शक्ती बनते. विद्यार्थ्यांना डेटा म्हणजे काय, तो कसा गोळा करायचा, त्यातून काय अर्थ काढायचा, आणि निर्णय घेण्यासाठी त्याचा उपयोग कसा करायचा याचे प्राथमिक प्रशिक्षण दिले जाते.
• डिजिटल कौशल्ये:
स्मार्टफोन, लॅपटॉप, इंटरनेट, ई-मेल, व्हिडीओ कॉल, ऑनलाईन फॉर्म भरणे, डिजीटल व्यवहार करणे यासारख्या कामांमध्ये निपुणता आवश्यक आहे. या कोर्समध्ये Microsoft Office, Gmail, Google Drive, Zoom, Digilocker, UPI इत्यादी प्लॅटफॉर्म्सवर काम करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
10वी आणि 12वीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी ही संधी वाया जाऊ न देता, नव्या युगातील कौशल्यांसाठी नवीन MS-CIT – AI Powered कोर्सची निवड करावी आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी पहिलं स्मार्ट पाऊल उचलावं !
गोंदिया जिल्ह्यातील 56 केंद्रांवर, सुसज्ज कम्प्युटर लॅब आणि प्रशिक्षकांसोबत MS-CIT कोर्स चे प्रवेश सुरू झालेले आहेत. अधिक माहितीसाठी आपण नजीकच्या MS-CIT केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) चे जिल्हा समन्वयक श्री. उमेश वैद्य कडून करण्यात आले आहे.