कोहमारा येथील जल जिवन मिशन योजना ठरली पांढरा हत्ती
40 लाख रुपयाची योजना ठरली डोके दूखी
15 दिवसांत काम पुर्ण करुन जनतेला पाणी देण्यात यावा अन्यथा महामार्गांवर क्रं 53 वर घागर घेऊन रस्ता रोको आंदोलन चां इशारा= सरपंच प्रतिभाताई भेंडारकर
सडक अर्जुनी= गोंदिया जील्हातील मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे विद्यमान आमदार राजकुमार बडोले यांच्या जन्मनगरीतील महामार्ग क्रमांक 53 वर असलेले ग्राम कोहमारा येथील माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या देवनगरीतील वॉर्ड नंबर एक दोन तीन तिन्ही वार्डामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत एक पाणी टाकी 30 लक्ष रुपये सोलर टॅंक पाच लक्ष रुपये दुसरी सोलर पाणी टाकी पाच लाख रुपये असा 40 लक्ष रुपयात तयार होत असलेला जल जीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन पाणीटंकीचे काम कंत्राटदाराच्या लापरवाहीमुळे पांढरा हत्ती झालेला आहे
तालुक्यातील माजी आमदार माजी मंत्री विद्यमान आमदार असलेली होणारा गावात पाणी टंचाई होणे ही खेदाची बाब आहे ज्या गावातील विद्यमान आमदार असताना ठेकेदार निष्काळजी पणाने काम करत असेल तर दुसऱ्या गावातील जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेले काम असेच आहे मोठ्या नेत्यांचा आशीर्वाद असल्यामुळे कर्मचारी अधिकारी व ठेकेदार यांना माज आला आहे
डूगगीपार पोलीस स्टेशन टोली वरील पाणी टंकी चे काम 95 टक्के होऊन सुद्धा आत्तापर्यंत वार्डामध्ये पाण्यासाठी महिला भटकंती करत आहेत संबंधित ठेकेदार तसेच इंजिनियर यांना सरपंच भेंडारकर यांनी पंधरा दिवसाचे अल्टिमेट दिला आहे की पंधरा दिवसांमध्ये वार्ड नंबर एक दोन तीन मधील तीनही पाणी टंकी सुरू न झाल्यास महामार्ग क्रमांक 53 वर संपूर्ण ग्रामपंचायत हद्दीतील महिला ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने घागर घेऊन रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा कोहमारा येथील सरपंच प्रतिभाताई भेंडारकर यांनी दिला आहे
सरपंच ग्रामपंचायत कोहमारा
प्रतिभा ताई देवीदास भेंडारकर
मी इंजिनीयर ठेकेदार यांना वारंवार फोन वर महिती देत आहेः की कोहमारा येथिल वॉर्ड क्रं 01+02+03 मधील जल जीवन मिशन अन्तर्गत पाणी टाकी चे काम 15 दिवसांत पुर्ण न झाल्यास महामार्ग क्रमांक 53 वर घागर घेऊन आंदोलन करण्यात येईल
मानकर उपअभियंता पाणीपुरवठा विभाग सडक अर्जुनी
दुसरी बोअरवेल झाल्यानंतर पाणी सूरू होईल . सोलर पाणी टाकी च्या ठेकेदार ला सांगतो की लवकरात लवकर काम पुर्ण करेल