प्रशासनाने केला भंडारा-गोंदियाच्या जनतेचा आणि लोकशाहीचा अवमान
— जनता दरबार रद्द प्रकरणी तीव्र निषेध!
45 डिग्री सेल्सिअस मध्ये झाडाखाली खा.डॉ.प्रशांत पडोळे घेतला पर्यायी जनता दरबार
गोंदिया –
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे लोकप्रतिनिधी खा. डॉ.प्रशांत पडोळे यांच्या पुढाकाराने सोमवार दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी तिरोडा येथील पंचायत समितीमध्ये जनता दरबार आयोजित करण्यात येणार होता. परंतु प्रशासनाने, विशेषतः तिरोडा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी, नियोजित कार्यक्रम अवघ्या काही अर्धा तास आधी रद्द केला. परंतु त्यांची सूचना, या संपर्क करू शकले नाहीत हे दुर्दैव आहे. ही घटना केवळ विद्यमान खासदाराचा नव्हे, तर संपूर्ण भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या जनतेचा आणि लोकशाही व्यवस्थेचा अवमान आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार डॉ. प्रशांत यादवरावजी पडोळे यांनी व्यक्त केली आहे.
जनता दरबारात आपल्या समस्या मांडण्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित झाले होते. मात्र त्यांची दिशाभूल करण्याचा काम तिरोडा येथील उपविभागीय अधिकारी यांनी केला. मात्र, कार्यक्रम रद्द पत्र बाहेर निघाल्यामुळे खासदारांनी झाडाखाली जनता दरबार आयोजित करून नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचा पर्दाफाश केला.
खासदारांनी उपस्थित प्रश्न उपस्थित करत म्हटले की, राज्य सरकारमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विधान परिषदेचे सदस्य अधिकाऱ्यांची बैठक घेतात, अधिकारी त्या बैठकीत कोणत्या नियमाने उपस्थित राहतात, याचे स्पष्टीकरण शासनाने द्यावे. तसेच माजी जनप्रतिनिधी अधिकारांची बैठक घेतात व त्यांना निर्देश देतात, हे कोणत्या नियमानुसार घडते, याचेही स्पष्टीकरण अपेक्षित आहे.
याउलट, विद्यमान खासदारांच्या सूचनेनुसार नियोजित जनता दरबार उपविभागीय अधिकाऱ्यांनी रद्द केला आणि त्या संदर्भातील पत्रात वापरलेली भाषा सौजन्यपूर्ण नव्हती तर आदेशवजा होती. सरकारने आपल्या अधिकाऱ्यांना सौजन्यपूर्ण वागणूक आणि भाषाशुद्ध संवाद याबाबत प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा आयोजित कराव्यात, अशी मागणी खासदारांनी केली.
उपविभागीय अधिकाऱ्यांनी जर काही अडचण होती तर ती खासदारांशी प्रत्यक्ष भेटून किंवा दूरध्वनीवरून सांगितली असती, तरीही त्यांनी तसे न करता सरळ जनता दरबार रद्द करण्याचा आदेश सोशल मीडियावर वायरल करून प्रोटोकॉलचा भंग केला, हा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे. तिरोडा येथील उपविभागीय अधिकारी यांनी एक दिवस अगोदर जनता दरबाराला उपस्थित राहा असे पत्र काढले आणि लगेच महायुती सरकारच्या दबावात येऊन अर्धा तास आधी सोशल मिडियावर पत्र घालने हे कितीपट योग्य आहे.
लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार
डॉ. प्रशांत पडोळे यांनी याप्रकरणी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार दाखल करणार असल्याचे जाहीर केले. हा फक्त निषेध नव्हे, तर लोकशाही व घटनात्मक अधिकारांवर झालेला घाला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई झालीच पाहिजे; अन्यथा संसदीय पद्धतीने हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात येईल.
यापुढचा जनता दरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात
प्रशासनास लोकांच्या प्रश्नांशी सोयरेसुतक नाही, त्यामुळे यापुढचा जनता दरबार थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घेण्यात येईल. जागा न मिळाल्यास रस्त्यावर जनता दरबार घेण्यात येइल अशी घोषणा खासदार.डॉ. पडोळे यांनी केली.,
जनतेच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढा – कांग्रेस जिल्हाध्यक्ष दीलिप बंसोड
भंडारा-गोंदियाच्या जनतेचा आणि तिच्या लोकप्रतिनिधीचा अपमान आम्ही सहन करणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढत राहू आणि जनतेने या लढ्यात साथ द्यावी, असे आवाहन कांग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बंसाेड यांनी केले आहे.
भंडारा गोंदिया लोकसभा सदस्य क्षेत्राचे खासदार यांनी पाण्याची समस्या, घरकुलाच्या समस्या, वनविभागाच्या समस्या, रस्त्याच्या समस्या, नाल्याच्या समस्या, अंगणवाडी पद भरती मध्ये झालेला घोळ, पट्ट्याच्या समस्या, बेगरसाठी घरकुल रेतीची व्यवस्था, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीची कामे अधुरी, बऱ्याच समस्याचे लेखी निवेदन दिले. त्या समस्याचे निराकरण होईल असेही यावेळी सांगितले.
खा.डॉ.प्रशांत पडोळे यांनी भरविला जनता दरबार पंचायत समितीच्या समोर झाडाखाली
जनतेची दिशाभूल करण्यासाठी उपविभागीय अधिकारी तिरोडा यांनी पूर्वसूचना न देता भाजपा सरकारच्या दबावाखाली काढला पत्र
भाजपा सरकारने गोंदिया जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, तिरोडा येथील उपविभागीय अधिकारी यांच्यावर दबाव घालून जनतेची समस्या न सोडविण्यासाठी दिला संदेश
भाजप सरकारचा निषेध असो
विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी अनुपस्थितीत मात्र जनता उपस्थित
जनता दरबार रद्दचा msg उपविभागीय अधिकारी तिरोडा यांनी काढल्यावरही जनतेच्या प्रश्न आणि समस्या ऐकून घेण्यासाठी भर उन्हात पंचायत समिती तिरोडाच्या समोर भंडारा- गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा.डॉ.प्रशांत पडोळे यांनी जनतेचे प्रश्न आणि समस्या लक्षात घेता त्याही परिस्थितीला सामोरे गेलेत. जनतेच्या समस्या ऐकून घेतल्यात. जनतेचा यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद होता. त्याच ठिकाणावरून संबधित अधिकारी यांना समस्या सोडविण्याचे आदेश दिले.
