महावितरणच्या लापरवाही मुळे दोन दिवस सडक अर्जुनी तालुका अंधारात
डोंगरगाव डेपो मध्ये लाईट पण बामणी खडकी अंधारात
अर्जुनी, २९एप्रिल २०२५
सडक अर्जुनी तालुक्यातील बामणी खडकी. दल्ली राजगुडा.मोगरा.मंदीटोला
.मुशानझोरवा व संपुर्ण तालुक्यातील गावांमध्ये अवकाळी पाऊस व वादळामुळे धान पिके व राहत्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
उन्हाळ्यात महावितरण च्या लापरवाही मुळे दिवसाला लाईन बंद करण्यात येत असते उन्हाळ्यात शेतकार्याला वेळेवर पाणी मिळत नाही
दोन दिवसापासून तालुक्यात वारा. पानी पाऊस येतं असल्यामुळे महावितरण ने एक रात्र लाईन बंद केली. पुन्हा दुसऱ्या दिवशी पान हलका फुलका पाऊस आल्यामुळे महावितरण च्या अल्गर्ज पणा चां फटका हा सामान्य जनतेला रात्री अंधारात रावा लागत आहे
सडक अर्जुनी तालुक्यातील डोंगरगावं डीपो इथे किती ही मुसळधार पाऊस आला तरी महावितरण लाईन बंद करत नाही पान डोंगरगावं डीपो जवळील बामणी खडकी गावात हलका फुलका पाऊस जरी आला तरी रात्र दिवस लाइन बंद करून ठेवली जाते ही शोकांतिका आहे
महावितरण चे वरिस्ट अधिकारि कोहमरा इथ सबस्टेशन आसून सुद्धा सडक अर्जुनी तालुका अंधारात असते
सडक अर्जुनी तालुक्यात आमदार. माजी मंत्री… माजी आमदार यांचे निवास स्थान असून सुद्धा महवितरन लापरवाही किती करते हे ताजे उधारण आहे
अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळामुळे तालुक्यात शेतकरी व नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत.
महावितरण च्या लापरवाही मुळे संपूर्ण सडक अर्जुनी तालुका हा दोन दिवसा पासून अंधारात पाहायला मिळत आहे