बिरसी एअरपोर्ट गोंदिया खा.डॉ.प्रशांत पडोळे यांनी गाजविली एअरपोर्ट समितीची बैठक 15 वर्षात झाली आजची पाचवी बैठक आणि खा.पडोळे यांनी वाचला पाढा

खेल मनोरंजन महाराष्ट्र राजनीति

बिरसी एअरपोर्ट गोंदिया
खा.डॉ.प्रशांत पडोळे यांनी गाजविली एअरपोर्ट समितीची बैठक
15 वर्षात झाली आजची पाचवी बैठक
आणि खा.पडोळे यांनी वाचला पाढा
 / गोंदिया:- बिरसी एअरपोर्ट येथे आढावा बैठक घेण्यात आली. विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. एअरपोर्ट तयार झाल्यापासून ते आजपावेतो येथील परिस्थीती (सिस्टम)माहिती घेतली.
15 वर्षात आज ही घेतलेली पाचवी बैठक होती.
परिसरातील जनतेच्या समस्या यावरही चर्चा झाली. पुनर्वशन देखावा म्हणून… पण त्यांना नागरी सुविधा शासन देऊ शकली नाही. काही कुटुंबाचे परत पुनर्वशन करणार आहेत. रस्ते नाहीत, नागरी सुविधा पासून वंचित आहेत., पाण्याची व्यवस्था नाही, बऱ्याच ठिकाणी स्वच्छता दिसून आली नाही.
पुनरर्वशनसाठी, त्यांच्या नागरीसुविधासाठी बिरसी तसेच परिसरातील गावासाठी जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले. त्यांना योग्य मोबदला दिला गेला पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करणार.
गोंदिया ते आयोध्या, गोंदिया ते दिल्ली, मुंबई विमान सेवा सुरू करण्यात यावी. इंटरनॅशनल दर्जा गोंदियाला मिळाल्या पाहिजे, प्रवाशी साठी चांगल्या सुविधा पुरवा, एटीम सुविधा, मेडिकल सुविधा उपलब्ध करण्याची गरज. त्यासाठी पाठपुरावा करा. असे बैठकीत चर्चेदरम्यान सांगितले.शासनाने गांभीर्याने हा विषय घ्यावा.
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा.डॉ.प्रशांत पडोळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली. बऱ्याच समस्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
श्री.गिरीशजी वर्मा डायरेक्टर एअरपोर्ट गोंदिया,
श्री.विशालजी अग्रवाल,
श्री.सुशिलजी खरकाटे,
श्री.राजुजी कुथे,
श्री.रोशनजी जयस्वाल,
श्री.उमेशशिंग पंडेले सरपंच बिरसी,
श्री.किशोरजी शेंडे तसेच
गोंदिया जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, एअरपोर्ट समितीचे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *