अखेर…. अतिक्रमण काढण्यास ग्रामपंचायतला यश
सडक अर्जुनी
तालुक्यातील शेंडा येथील दुर्गा चौकातील अतिक्रमण ग्रामपंचायतच्या माध्यमातून काढण्यात आले.
या ठिकाणी येणाऱ्या – जाणाऱ्या प्रवासी नागरिकांची मोठी वर्दळ असते. राणी दुर्गावती चौकात ग्रामपंचायत कडून दुकानाकरिता चाळ व प्रवासी निवारा तयार करण्यासाठी चौकातील अतिक्रमण काढण्याचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. ग्रामपंचायतकडून संबंधित अतिक्रमण धारकांना वारंवार सूचना देऊ सुद्धा अतिक्रमणधारक आडकाठी भूमिका घेत होते. ग्रामपंचायत प्रशासन तथा गावकऱ्यांच्या एकमताने अतिक्रमण धारकांना सूचना देण्यात आली होती. अतिक्रमण धारकांनी ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या या निर्णयाला प्रतिसाद न देता आज अखेर ता. ०5 रोजी केलेले अतिक्रमण ग्रामपंचायत च्या पदाधिकाऱ्यांनी काढले. परिणामी अतिक्रमण धारक आणि ग्राम पंचायत मधील संघर्ष टळला गावहित प्रथम समजून काहीअतिक्रमण धारकांनी घेतलेल्या या भूमिकेचे गावकऱ्यांनी स्वागत केले आहे.
मात्र गाव अंतर्गत रस्त्यावर छोट्या-मोठ्या व्यावसायिक दुकानदारांनी व काही नागरिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे आधीच अरुंद असलेला रस्ता वाहतुकीसाठी अधिकच अरुंद रस्ता होता. परिणामी अनेक अपघात होऊ शकतात. मात्र अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण काढण्यास मनाई केल्यामुळे काही दिवस ग्राम पंचायत प्रशासन व अतिक्रमण धारक यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता.
अखेर काही अतिक्रमण काढण्यात आले. काही प्रमाणात अतिक्रमण बाकी असून ग्रामपंचायत यावर काय भूमिका घेतात ,याकडे गावकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.अतिक्रमण काढतेवेळी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच भीमराव राऊत, ग्राम अधिकारी कु. सी डब्ल्यू कापगते, मुन्ना सोनवाने तंटामुक्ती अध्यक्ष ,छत्रपाल परतेकी ग्रामपंचायत सदस्य, मार्कंड परिहार, शोभेलाल मरसकोल्हे, पुष्पा गणवीर, भारतीताई शिरसाट ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.