*शेंडा( कोयलारी ) येथे सुप्रसिद्ध सप्त खंजरी वादक डॉ. रामपाल महाराजांचे जाहीर कीर्तन*
*बुद्ध पौर्णिमेनिमित्त सत्कार व कार्यक्रमाचे आयोजन*
सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम शेंडा येथे दिनांक 12/5/2025 रोज सोमवारला बुद्ध पौर्णिमे निमित्त समाज प्रबोधक व मान्यवरांचा सत्कार या कार्यक्रमाचे आयोजन ग्राम पंचायत समोरील भव्य आवारात केले आहे. या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून विवेक जी पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी तसेच वरून कुमार शहारे उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोर. उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय राजकुमार जी बडोले साहेब, अध्यक्ष लायक रामजी भेंडारकर, उमेश काशीद प्रकल्प अधिकारी देवरी, डॉक्टर नितीन वानखेडे डी. एच. ओ. गोंदिया, इंद्रायणी गोमासे तहसीलदार सडक अर्जुनी, दिलीप बनसोड माजी आमदार, यशवंत गणवीर माझी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, डॉ. सुभाष चंद्रिकापुरे, डॉ. अजय लांजेवार, चेतन वडगावे सभापती समिती अर्जुनी, चंद्रकला ताई डोंगरवार जिल्हा परिषद सदस्य गोंदिया, अल्लाउद्दीन राजानी पंचायत समिती सदस्य, आनंद चंद्रिकापुरे, दानेश साखरे, डॉक्टर चाटे वैद्यकीय अधिकारी शेंडा व सडक अर्जुनी तालुक्यातील सर्व पत्रकार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.2588 व्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त सुप्रसिद्ध सप्त खंजिरी वादक, प्रबोधनकार, डॉक्टर रामपाल महाराज यांच्या सत्यवानी जाहीर कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन व इत्यादी मान्यवरांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्यामुळे सदर कार्यक्रम प्रसंगी परिसरातील नागरिकांनी डॉक्टर रामपाल महाराज यांची सत्यवाणी ऐकण्यासाठी कार्यक्रम स्थळी उपस्थित राहण्याचे आयोजकांनी केले आहे.