तो देवदूत… अपघातस्थळी येतो: उपचारासाठी घेऊन जातो!

अपराध करियर करोबार खेल देश मनोरंजन महाराष्ट्र राजनीति लाइफस्टाइल विदेश शिक्षा स्वास्थ्य

तो देवदूत… अपघातस्थळी येतो: उपचारासाठी घेऊन जातो!
स /अर्जुनी

अनिरुद्ध वैद्य तालुका प्रतिनिधी सडक अर्जुनी 

एखादा अपघात घडल्यानंतर त्यांची मदत करायलाही अनेकजन घाबरतात. आपण कशाला भानगडीत पडायचे, असा समज करून निघून जातात. मात्र बाम्हणि येथील गुरुदेवसिंग ठाकूर हे गत अनेक वर्षांपासून अपघाताती जखमी लोकांना मदत करीत आहेत. अपघातग्रस्तांना मदत करणे हेच त्यांचे ध्येय बनले आहे. प्रसिद्धी, बक्षिसापासून ते दुरच असतात. ठाकूर यांनी आजपर्यंत 290 हून अधिक गंभीर जखमी अपघातग्रस्तांना वेळेत रुग्णालयात पोहचवले आहे. त्यांच्या तत्परतेमुळे रुग्णाचे प्राण वाचले आहे.
ठाकूर यांनी अनेकवेळा ना सरकारी रुग्णवाहीकेची वाट पाहीली, ना कधी कुणाकडून पैसे घेतले. स्वतःच्या गाडीने, निस्वार्थ सेवेने ते रुग्णांना भरती करतात. अनेक वेळा रुग्णालयाचा खर्चही स्वतःच उचलतात. काही दिवसांपूर्वी नागपूर. रायपूर रोड वर बह्मनी गावा जवडील झालेल्या अपघातग्रस्तांना वेडेवर रुग्णवाहीकेची वाट न पाहता स्वतः च्या गाडीने रुग्णालयात दाखल करून त्यांचे प्राण वाचविले
*ना नाव विचारलं, ना जात पाहिली: फक्त जखमा बघितल्या*
गुरुदेवसिंग ठाकूर हे अपघातग्रस्तांना सुरूवातीला त्यांची गरज ओळखून रुग्णालयात उपचारासाठी नेतात. अशा दुताचा शासनाने योग्य सन्मान करावा. रोड सेफ्टी इव्हेंटमध्ये त्यांना सन्मानाने मंचावर आमंत्रित केले जावे, अशी भावना नागरिकांची आहे.
*चित्रसेवा* अनिरुद्ध वैद्य , Mtv News 9/सडक अर्जुनी प्रतिनिधी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *