गॅसचे भाव वाढले, अनेकांना भरणे अशक्य
सडक अर्जुनी* अनिरुद्ध वैद्य
काही वर्षांपासून गॅस सिलिंडरच्या भावात सतत वाढ होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब जनता त्रस्त झाली आहे. गॅस सिलेंडरचे वाढते दर सर्वसामान्याना पेलवत नसल्याने ग्रामीण महिलांनी पुन्हा शेत, जंगलाची वाट धरली आहे. सिलेंडर रिफील केला जातच नाही.
महिलांना पावसात, उन्हातान्हात वणवण करत स्वयंपाकासाठी सरपण मिळविण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे. वाढती महागाई आणि गॅस दरवाढीने सर्वसामान्यासह गरीब कुटुंबातील महिलांचे नियोजन ढासळले आहे. जिवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत असल्याने गोरगरीबाची पंचाईत झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरची किंमत वाढली आहे. या किंमती व्यतिरिक्त गाडीभाडेही द्यावे लागत आहे. त्यातच गॅसची सबसिडीही बंद झाली आहे.
योजनेचा मुळ उद्देश बाजूला पडला आहे. गॅस दरवाढीने कधीच मागे वळून पाहीले नाही. सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे मोलमजुरी करणा ऱ्याना गॅसवर स्वयंपाक करणे आता परवडेनासे झाले आहे. ग्रामीण भागातील हातावर पोट असणाऱ्या गरिबांना, कष्टकरी महिलांना या सिलेंडरची किंमत परवडत नसल्याने ग्रामीण भागातील महिला पुन्हा चुलीकडे वळल्याचे दिसून येत आहे.
*चित्रसेवा* अनिरुद्ध वैद्य
*शब्दाकंन* अनिरुद्ध वैद्य MTVnews9 सडक अर्जुनी तालुका प्रतीनीधी.
