ग्राम शेंडा (कोयलारी ) येथे समाधान शिबिराचे आयोजन
दिनांक 20/06/2025 ला सकाळी 09:00* वाजता महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार मंडळ शेंडा येथे “*छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर*” आयोजित करण्यात आले होते .या कार्यक्रमात अध्यक्ष वरून कुमार शहारे उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव , उद्घाटक, राजकुमार बडोले आमदार, माझी सामाजिक न्याय मंत्री, प्रमुख उपस्थिती. इंद्रायणी गोमाशे तहसीलदार सडक अर्जुनी, विशेष अतिथी. चेतन वडगावे पंचायत समिती सभापती सडक अर्जुनी, अल्लाउद्दीन राजानी पंचायत समिती सदस्य, डॉक्टर संजय गौतमवार मुख्याध्यापक शासकीय आश्रम शाळा शेंडा, निशिकांत कोडापे एकात्मिक आदिवासी विभाग देवरी, पाठक साहेब कृषी अधिकारी सडक अर्जुनी,प्रशांत शहारे सामाजिक कार्यकर्ता, वामन लांजेवार शेंडा परिसरातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाले.
यामध्ये विशेष करून शेंडा जिल्हा परिषद क्षेत्रातील गोपाळ समाजातील लोकांना जातीचे दाखले वितरण करण्यात आले, ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता,शेतकरी, विद्यार्थी व महिला यांना रहिवासी, उत्पन्न व जातीचे दाखले, राशन कार्ड वाटप, सामाजिक लाभाच्या योजना जसे संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान, agristack , कृषी विभागाच्या योजना, उमेद योजना इत्यादी महसूल विभागाशी संबंधित विविध प्रमाणपत्रांचे वाटप व जनतेच्या तक्रारी निकालात काढण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यु. डी. रहांगडाले यांनी केले तर आभार प्रवीण तळेगावकर आदिवासी विभाग गृहपाल सडक अर्जुनी