ग्रामपंचायत कोहमारा तर्फे कृषी दिनाचे औचित्य साधून माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वृक्ष लागवड महोत्सव साजरा
सडक अर्जुनी, दि. 5 जुलै
तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय कोहमारा तर्फे कृषी दिनाचे औचित्य साधून माझी वसुंधरा अभियान अंतर्गत दि. 5 जुलै रोजी वृक्ष लागवड महोत्सव साजरा करण्यात आला.
एक ग्रामस्थ, एक झाड, हरित वारसा हा संकल्प घेऊन बळीराजा कृषी दिनानिमित्त वृक्ष लागवड महाअभियानाचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय तर्फे ग्रामपंचायत भवन येथे करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य कविता रंगारी, निशा तोडासे, पंचायत समिती सभापती चेतन वडगाये, सदस्य शिवाजी गहाणे, वनपरीक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे, पोलीस उपनिरीक्षक फाले, कृषी सहाय्यक कु. गुज्जरकर, शेंडे आरोग्य विभाग, कोहमारा बिट चे पोलीस कर्मचारी गुणवंत कठाने, सरपंच प्रतिभा ताई भेंडारकर, उपसरपंच विलास वरकडे, पोलीस पाटील रेखा बडोले, ग्राम सचिव कु. टी. डी.टेकाम, तलाठी बिसेन, तसेच ग्रामपंचायत सदस्य, व इतर समित्यांचे पदाधिकारी आदी होते.
याप्रसंगी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत झाडू व वृक्ष देऊन करण्यात आले हे विशेष. याप्रसंगी उपस्थित पाहूणे, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी तसेच संपूर्ण ग्रामस्थ यांच्या हस्ते 300 च्या जवळपास विविध प्रजातीचे वृक्ष लागवड करण्यात आले.