मुरूम खाली कर,अन् पळून जा”शासकीय कामात अडथळा गुन्हा दाखल अवैध मुरूम वाहतूक; महसूल विभागाची दंडात्मक कारवाई

अपराध महाराष्ट्र

मुरूम खाली कर,अन् पळून जा”शासकीय कामात अडथळा

गुन्हा दाखल

अवैध मुरूम वाहतूक; महसूल विभागाची दंडात्मक कारवाई ‌ ‌

सडकअर्जुनी:–अवैध रेती, मुरूम वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्याबाबतच्या आदेशानुसार महसूल विभागाचे कर्मचारी रात्री गस्तीवर असताना दि.५जुलै २०२५ ला रात्री ८.३० वाजे दरम्यान सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम बोपाबोडी येथे अवैध मुरूमाने भरलेला एका इसमाच्या अंगणात विना क्रमांक ट्रॅक्टर आढळला.त्यास थांबवून विचारले असता, कोणताही परवाना नसल्याचे सांगितले.सदर चालकाला महसूल विभागाचे कर्मचाऱ्यांनी ओळख सांगितली आणि “तु ट्रॅक्टर मधून मुरूम खाली करु नको ,तो ट्रॅक्टर आमच्यासोबत घेऊन चल”असे सांगितले.परंतू बाजूला उभ्या असलेल्या एका व्यक्तीने “मुरूम खाली कर व पळून जा”असे ट्रॅक्टर चालकास बोलले.सदर ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर मधील मुरुम खाली करून पळून गेला.त्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने तसेच अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टरसह चालक पळून गेल्याने उपविभागीय अधिकारी वरुण कुमार शहारे यांचे तोंडी आदेशानुसार तलाठी विजय पवार यांनी पोलिस स्टेशन डुग्गीपार येथे रिपोर्ट दाखल केला आहे. ‌ ‌ सविस्तर वृत्त,ग्राम बोपाबोडी येथे गावात गस्ती करीता गेले असता,रात्री साडेआठ वाजेदरम्यान विना क्रमांकाचे ट्रॅक्टर मध्ये अंदाजे एक ब्रास मुरूम अंदाजे १२०० रुपये किंमतीचा मुद्देमाल भरलेला आढळला.ट्रॅक्टर चालक नामे प्रविण लोकेश मेश्राम वय २७ वर्षे याला मुरुम खाली करु नको असे सांगितले.परंतू ट्रॅक्टरच्या बाजूला उभ्या असलेल्या नामे उपसरपंच गणेश जीवन कापगते वय ३३वर्षे या इसमाने ट्रॅक्टर मधील मुरूम खाली कर, अन् पळून जा असे बोलल्याने ट्रॅक्टर चालक मुरूम खाली करून घटनास्थळावरून पळून गेला.शासनाच्या अधिकार क्षेत्रातील ट्रॅक्टर मधील एक ब्रास मुरुमासह एकुण ६ लाख १२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेत,एक ब्रास मुरुमाने भरलेला ट्रॅक्टर चालकास पळून जाण्यास चिथावणी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने उपसरपंच गणेश जीवन कापगते तसेच प्रवीण लोकेश मेश्राम यांचेवर गुन्हा नोंद करण्यास पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे उपविभागीय अधिकारी वरुण कुमार शहारे यांचे तोंडी आदेशानुसार रिपोर्ट दाखल केला.त्यानुसार दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.)२०२३ नुसार कलम ३०३(२),३०५(इ),२२१,४९,३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुढील तपास डुग्गीपार पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *