मारुती व्हॅन गाडीवर झाड पडल्याने दोन लोकांचा जागेस मृत्यू
सडक अर्जुनी शहरातील दुर्दैवी घटना
सडक अर्जुनी= चार दिवसापासून गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार एंट्री झाल्यामुळे ठिकाणी पावसामुळे रोड खचली नदी नाले वाहून गेले गावांमध्ये पाणी शिरला किती तरी गावांचा ये जा करण्याचे रस्ते बंद झाले त्याच दरम्यान आज दिनांक 09 जुलै रोजी सडक अर्जुनी येथील पेट्रोल भरायला गेलेले मारुती व्हॅन गाडी क्रमांक एम एस 31 सीआर 15 49 आपल्या कारणे पेट्रोल भरून घराकडे वापस जात असताना आरा मशीन समोरील रोडवर मारुती व्हॅन गाडीवर झाड पडल्याने दोन लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला
1) वासू खेळकर व अंदाजे 50 वर्ष
2) बंडू राऊत सडक अर्जुनी
असे मृत्यू पावलेल्या इसमांचे नाव आहे अपघाताची माहिती मिळताच सडक अर्जुनी शहरात शोककळा पसरली आहे जनतेचे म्हणणे आहे की महामार्गाच्या साईटला गावातील रोड रस्त्याच्या साईटला वयोवृद्ध झालेले प्रत्येक झाडांना तोडण्यात यावा रोडच्या कडेला असलेले वयोवृद्ध झाड यांना कापण्यात यावे अशी जनतेची मागणी आहे
