आरंभ फाऊंडेशन इंडियाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप .

करोबार खेल शिक्षा

आरंभ फाऊंडेशन इंडियाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप .

सडक अर्जुनी.
पळसगाव/राका येथील आरंभ फाऊंडेशन इंडियाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसगाव / राका येथील इयत्ता पहिली ते सातवीत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना वार्षिक शिष्यवृत्ती वाटपाचा सोहळा 12 जुलै 2025 ला उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच भारती लोथे होत्या. तर पुरस्कार वितरक म्हणून पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण चौव्हाण होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून फाऊंडेशनचे
संस्थापक /अध्यक्ष प्रमानंद रंगारी, फाऊंडेशनच्या आधारस्तंभ शकुंतलाबाई रंगारी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवराम कापगते, उपाध्यक्ष भोजराज कापगते, सदस्य स्मिता येरपुडे, खुशबू उईके, उपसरपंच शोभा येरपुडे,ग्रामपंचायत सदस्य सुभाष कापगते, केंद्रप्रमुख वाय. एल. मंगलमारे ,अपंग समावेशक शिक्षण विभागाचे विषय साधनव्यक्ती दीनदयाल बोपचे, मुख्याध्यापक भास्कर नागपुरे, फाऊंडेशनचे संचालक कमलराव रंगारी, प्रकल्प समन्वयक आर. व्ही. मेश्राम आदी उपस्थित होते.

सर्वप्रथम मान्यवरांनी क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले व माता सरस्वती
यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून
अभिवादन केले.
यावेळी यश देवराम कापगते, अवनी गोपाल कापगते, अंशुल सुनील चांदेवार, दृष्टी नरेंद्र बावनकुळे, समीक्षा कैलास सावरकर, करीना दीपक मेश्राम व गायत्री भोजराज कापगते आदी गुणवंत विद्यार्थ्यांना आरंभ फाऊंडेशन इंडियाच्या वतीने रोख शिष्यवृत्ती, मेडल, नोंडबुक,पेन व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण चौव्हाण यांनी, ‘ विद्यार्थ्याचा खरा मित्र पुस्तक आहे. नियमित पुस्तके वाचावीत. आळस बाळगू नये. शिस्त, स्वावलंबन आदी गुण ठेवावेत ‘असे आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
फाऊंडेशनचे संस्थापक/ अध्यक्ष ,प्रमानंद रंगारी यांनी ‘ विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घ्यावे. विज्ञानावर भर द्यावे. मेहनत घ्यावी. चांगल्या सवयी
लावाव्यात असे मार्गदर्शनात सांगितले.
तसेच विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा व आवड असावी असे मत सरपंच भारती लोथे यांनी व्यक्त केले.
आरंभ फाऊंडेशनचे प्रकल्प समन्वयक आर. व्ही. मेश्राम यांनी
प्रास्ताविकेतून फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मंजुश्री लढी यांनी केले तर आभार
मुख्याध्यापक भास्कर नागपुरे यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक के.एच. चोपकर,एम. बी.बेंदवार,काजल कापगते, वर्षा पुस्तोडे व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले.
उल्लेखनीय म्हणजे, आरंभ फाऊंडेशन इंडियाचे संस्थापक/ अध्यक्ष प्रमानंद रंगारी यांनी जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक शाळा पळसगाव / राका येथे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेतले असून ते सध्या
अमेरिका येथे नोकरीवर आहेत. ते
फाऊंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी एक मदत कार्य म्हणून विविध उपक्रम राबवित आहेत.

सडक अर्जुनी _ गुणवंत
विद्यार्थ्यांसह उपस्थित गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण चौव्हाण, फाऊंडेशनचे संस्थापक/ अध्यक्ष प्रमानंद रंगारी, आधारस्तंभ शकुंतलाबाई रंगारी, सरपंच भारती लोथे व इतर मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *