खासदार साहेब तो फरार डॉक्टर एरेस्ट होणार की नाहि
पोलिश विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह 15 दिवस लोटून सुध्दा आरोपी डॉक्टर फरार
साकोली शहरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये १७ वर्षीय मुलीसोबत एकांतात विकृत प्रकार!
पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून डॉक्टरविरुद्ध पोस्को सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल:आरोपी फरार ?
गोंदिया
साकोली शहरातील प्रसिद्ध श्याम हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉक्टरनेच सोनोग्राफीच्या बहाण्याने अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना दि. ९ जुलैला उघडकीस आली आहे.देवेश अग्रवाल असे डॉक्टरचे नाव असून,सदर मुलगी आपल्या आईसोबत उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आली होती.डॉक्टर देवेश अग्रवाल यांनी आई व नर्सला बाहेर बसवून रुग्ण मुलीसोबत सोनोग्राफी रूममध्ये तब्बल अर्धा तास अश्लील चाळे केल्याचा असा गंभीर आरोप आहे.
घडलेली घटना पीडितेने आई-वडिलांना सांगितल्यानंतर साकोली पोलिसांनी या प्रकरणी १० जुलैला गुन्हा दाखल करून डॉ.देवेश अग्रवाल (वय अंदाजे ४५वर्ष,रा.सौंदड) याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी डॉक्टर अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.मात्र साकोली शहरात या घटनेमुळे संतापाची लाट पसरली आहे.
जनतेचे म्हणणे आहे की भंडारा गोंदियाचे खासदार साहेब तो फरार आरोपी डॉक्टर एरेस्ट कधी होणार
पोलिश वीभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे की 15 दिवस लोटून सुध्दा आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही कुठ तरी पाणी मुरत असल्याची चर्चा परिसरात जोर धरत आहे
एखादा गोर गरीब असता तर पोलिसांनी त्याला त्वरीत एरेस्ट केला असता पण श्रीमंत आरोपी अशल्यामुळे पोलिश विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे