शिक्षक निघाला भक्षक
सडक अर्जुनी तालुक्यातील घटना
पोस्को अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल
सडक अर्जुनी=
विद्यार्थिनीची असेल चाळे करणाऱ्या शिक्षकावर पोस्को ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सडक अर्जुनी तालुक्यातील खाजगी शाळा ग्रामविकास पूर्व माध्यमिक सेमी इंग्रजी शाळा कोळी टोला आदर्श शिक्षण संस्था सावरे (ज.न. )तालुका भंडारा अल्पसंख्याक द्वारा संचालित शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनीची अश्लील चाळे केल्याची गंभीर घटना घडली आहे संबंधित शिक्षकांवर शुक्रवारी दिनांक 18 ला बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोस्को ॲक्ट अंतर्गत डूग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याला अटक करून पोलीस कोठडी सुनावली आहे.नंतर 21 जुलै रोजी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे
शामराव रामजी देशमुख (53 ) राहणार कोहमारा असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे वर्ष 2023 पासून 2025 या कालावधीत शाळेतील विद्यार्थिनींची सोबत वारंवार अश्लील वर्तन करीत असल्याचे समोर आले आहे या प्रकरणाची तक्रार चाईल्ड हेल्पलाइन क्रमांक 1098 या हेल्पलाइन क्रमांक वर करण्यात आली तक्रारीनंतर बाल न्यायालय मंडळ आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनि चौकशी सुरू केली त्यात संबंधित शिक्षकाने विद्यार्थिनीची अश्लील चाळे केल्याचे स्पष्ट झाले. चौकशी अहवालाचे आधारे शुक्रवारी दिनांक 18 /07 /2025 रोजी पोलीस ठाण्यात पोस्को ॲक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत आरोपीला अटक केली .आरोपीला सोमवारी दिनांक 21 न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला पोलीस कोठडी ची आदेश देण्यात आले आहे सोमवारी त्याला न्यायालयान कोटली सुनावण्यात आली आहे .
ठाणेदार डुग्गीपार पोलीस स्टेशन
गणेश वनारे
चाईल्ड हेल्पलाइन 1098 वर जिल्हा बालकल्याण संरक्षण अधिकारी यांना कॉल आला होता की ग्रामविकास पूर्व माध्यमिक शाळा कोहडीटोला येथे विद्यार्थिनींचे लैंगिक छळ होतात यावरून जिल्हा बालकल्याण संरक्षण अधिकारी यांनी एक समिती नेमण्यात आली होती त्या समितीचे अहवाला नंतर समुपदेसक यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे आरोपी शिक्षक शामराव रामजी देशमुख यांच्यावर पोस्को ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलाय पुढील तपास सुरू आहे
