त्या फरार डॉक्टर च्या दोन्ही भावावर गुन्हे दाखल तेही फरार
पोलिसांना खोटी माहिती पुरविणाऱ्या आरोपी डॉक्टर च्या परिवारातील सदस्यांवर पोलिसांची टांगती तलवार
आरोपी डॉ देवेश अग्रवाल ची माहिती मिळाल्यास साकोली पोलिसांना त्वरीत माहिती द्या
पोलिस निरीक्षक महादेव आचरेकर
साकोली = येथील श्याम हॉस्पिटल ची संचालक असलेले पोस्ट गुन्हेतील आरोपी डॉक्टर देवेश अग्रवाल अजून फरार आहेत. त्याला पळून जाण्यास मदत करणारे त्याचे दोन भाऊ डॉक्टर भारत अग्रवाल व डॉक्टर जितेश अग्रवाल यांना पोलिसांनी आरोपी बनविले असल्याची माहिती देण्यात येत आहे
या प्रकरणात एकूण तीन आरोपी पोलीस रेकॉर्डनुसार फरार घोषित करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे .पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांनी प्रसार माध्यमांना दिली
पोस्को अंतर्गत फरार असलेला आरोपी देवेश अग्रवाल याच्या शोध अजून सुरू आहे डॉक्टर देवेश अग्रवाल च्या वकिल्याने 22 जुलैला नागपूर उच्च न्यायालयात अंतरिम जमिनी करिता अर्ज केला होता उच्च न्यायालयाने त्याचा अंतिम जामीन अर्ज फेटाळून लावला त्याला मदत करणाऱ्या त्याच्या दोन्ही भावांना आरोपी करण्यात आले असून त्यांच्यावरही वेगवेगळ्या कलमांतर्गत साकोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे
त्याच्या हॉस्पिटलचा परवाना रद्द करणे तसेच वैद्यकीय परवाना रद्द करन्याची कारवाई सुरू आहे पोलीस विभागाच्या वतीने करण्यात येत आहे मेडिकल कौन्सिल ला तसेच वैद्यकीय कार्यालयाला पत्र पाठवण्यात आले त्याची आँचल संपत्तीची माहिती घेणे सुरू असून लवकरच ही संपत्ती जप्त करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे
आरोपी शोधण्यासाठी सर्व पोलीस यंत्रणेला लूक आउट ची नोटीस देण्यात आले या तीनही आरोपी बाबत कुठलीही माहिती कोणालाही मिळाल्यास पोलीस स्टेशन साकोली येथे त्वरित कळविण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांनी केले आहे
आरोपी डॉक्टरच्या नातेवाईकावर पोलिसांची टांगती तलवार
फरार झालेल्या आरोपी डॉक्टरला अटक करण्यासाठी पोलिसांकडून जोरकस प्रयत्न सुरू आहेत त्यांच्या नातेवाईकाकडून पोलिसांना चुकीची माहिती दिली जात आहे आरोपींना मदत करणे आरोपीची माहिती असून सुद्धा पोलिसांपासून माहिती लपविणे नातेवाईकाना सुद्धा आरोपी बनवण्याची प्रतिक्रिया पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे