सरपंच हर्ष मोदी यांनी उप सरपंच रोशन शिवणकर यांनी लावलेल्या खोट्या आरोपांचे पुरावे देत केला पर्दाफाश
सडक अर्जुनी= -:- गोंदिया जिल्याच्या सडक अर्जुनी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या सौंदड ग्रामपंचायतचे सरपंच हर्ष मोदी यांच्यावर उप सरपंच रोशन शिवणकर यांनी लावलेल्या आरोपांचे खंडन करीत पत्रकार परिषदेत पुरावे देत रोशन शिवणकर यांच्या आरोपांचा पर्दाफाश केला आहे
= -:- सडक अर्जुनी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सरपंच हर्ष मोदी यांनी स्वतःवरील आरोपांना सडेतोड उत्तर देत उप सरपंच रोशन शिवणकर यांनी ग्रामपंचायतीवर केलेले आरोप केवळ जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी व राजकीय द्वेषातून केल्याचे सरपंच हर्ष मोदी यांनी सांगितले आहे. तसेच आरोपण मध्ये केलेल्या कामांचे पुरावे आणि कागद पत्रे दाखविले यात ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकासकामांचे मूळ दस्तऐवज,आर्थिक व्यवहारांचे बिले तसेच कामांची छायाचित्रे आणि संबंधित पुरावे जनतेसमोर पत्रकार परिषदेत दाखविले .ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीत कोणताही अपारदर्शकपणा नसून सर्व निर्णय ग्रामसभेच्या सहमतीने आणि नियमानुसार घेतले जात असल्याचे स्पष्ट केले .या पत्रकार परिषदेमुळे रोशन शिवणकर यांचे आरोप बिनबुडाचे असून त्यांचा आधार फक्त राजकीय लाभ मिळवणे हाच हेतू असल्याचे सरपंच हर्ष मोदी यांनी सांगितले आहे
:- हर्ष मोदी सरपंच ग्राम पंचायत सौंदड
:- तर सरपंच हर्ष मोदी यांनी ग्रामपंचायतीवर सरपंच म्हणून निवडून येताच पाच वर्षाच्या कार्यकाळात पाच उप सरपंच तयार करून ग्राम पंचयतीचा विकास करून घेणायचा ध्यास घेतला आणि गेल्या तीन वर्षात तीन उप सरपंच घडवून दाखविले.मात्र रोशन शिवणकर हे विरोधी गटात असताना उपसरपंच म्हूणन निवडून आले असून गेल्या एका वर्षात सरपंच हर्ष मोदी यांच्यावर अनेक आरोप करीत त्यांची राजकीय छवी उधळून लावण्याचा प्रयत्न केला.मात्र हर्ष मोदी यांनी रोशन शिवणकर यांनी लावलेल्या एकूण एक आरोपांचे पुरावे सादर करीत आरोपांचे खंडन करीत रोशन शिवणकर यांच्यावर मान हानीचा दावा केला असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे
