शेतकऱ्यांचे पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन
अधिकाऱ्यांचा कामचुकारपना
सडक अर्जुनी= तालुक्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेत अनेक ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी गाईचे गोठे तयार केले . सन 2021 ते 2025 मध्ये तयार होणाऱ्या गोठ्याचे अनेक दिवस निधी नसल्याने पैसे मिळण्यास आधीच विलंब होत असताना काही अल्पसा निधी उपलब्ध होताच मनरेगा योजनेचे एपीओ हरीश कटरे यांनी परस्पर लाभार्थ्यांकडून पैशाची देवाणघेवाण करून नियमबाह्य पद्धतीने बिलाचे वाटप केले शिवाय या योजनेअंतर्गत कोणत्याच लाभार्थ्यांचे काम हे विना पैशाने होत नाही. ही बाब लक्षात येताच गौरेश बावनकर आणि किशोर डोंगरवार यांनी दोसींवर कार्यवाही करण्यासाठी दिनांक 30/ 7 /2025 ला माननीय खंड विकास अधिकारी पंचायत समिती सडक अर्जुनी यांना निवेदन दिले असता दिनांक 4 /8/ 2025 ला सहा दिवस लोटूनही कोणत्याच प्रकारची कार्यवाही झालेली नाही म्हणून आज असंख्य लाभार्थी पंचायत समितीच्या गेटवर ठिय्या आंदोलन करण्याचा तयारीत होते. पण पोलीस प्रशासन आणि पंचायत समितीचे सभापती यांच्या हस्तक्षेपाने हे आंदोलन काही काळासाठी स्थगित करण्यात आले. संबंधित दोषीवर दोन दिवसात कार्यवाही करण्याचे आश्वासन पंचायत समितीचे सभापती चेतनजी वडगाये यांनी दिले दोन दिवसाच्या आत संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही न झाल्यास पुढील काही दिवसात तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा यावेळी लाभार्थी शेतकऱ्यांनी दिला याप्रसंगी गौरेशजी बावनकर किशोर डोंगरवार, प्रशांत झिंगरे, अशोक बाळबुद्धे,रवींद्र कापगते,पराग कापगते,परमानंद गहाणे, शालिकराम जी मस्के आणि असंख्य शेतकरी उपस्थित होते.