क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान तर्फे ग्रामपंचायत कोहमारा येथे निशुल्क आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.
सडक अर्जुनी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील ग्रामपंचायत कोहमारा येथे दिनांक 04 ऑगस्ट रोजी सोमवारला मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषद, नवी दिल्ली द्वारा संचालित आयुष मंत्रालय भारत सरकारच्या वतीने या आरोग्य तपासणी शिबीरासाठी सडक अर्जुनी तालुक्यातून कोहमारा ग्रामपंचायतची निवड करण्यात आली. त्या अनुशंगाने नंदनवन नागपुर येथील क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान तर्फे दिनांक 04 ऑगष्ट रोजी सोमवारला ग्रामपंचायत कार्यालय कोहमारा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. विशेष म्हणजे सलग आठ दिवस क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान चे डॉक्टर या ग्रामपंचायत मध्ये भेट देत असून स्थानिक महिलांकडून सामाजिक पारंपारिक सांस्कृतिक सणासुदीच्या मधल्या दिनचर्या, सणांची विशेषता या क्षेत्रातील सण कोणते व कसे साजरे करतात, त्यात काय वैशिष्ट्य आहे? अशा विविध प्रकारची माहिती गोळा करून अधिक प्रमाणात ते माहिती जाणून घेत आहेत. तसेच आपल्या आरोग्यासाठी आयुर्वेद किती महत्त्वाची आहे हे पटवून सांगत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून एक दिवस मोफत आरोग्य तपासणी व आयुर्वेदिक औषधांचे मोफत वितरण याप्रसंगी करण्यात आले. एकूण दोनशेच्या जवळपास स्थानिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतल्याचे सांगण्यात आले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सरपंच प्रतिभाताई भेंडारकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
या शिबिरासाठी क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान चे डॉ. दिपिका डोंगरे, डॉ. पूजा टिपले,कार्यालयीन सहाय्यक स्मिता कामडे, फार्मासिस्ट कांचन गावंडे, एमटीए आकाश काकडे व चालक मयूर गिरडकर इत्यादी कर्मचारी काम करत असून स्थानिकांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले आहे.