निराधारांना पाच हजार अनुदान द्यावे, औषधोपचारासाठी परवड
सडक अर्जुनी: अनिरुद्ध वैद्य
शासनाकडून सध्या निराधारांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ पेन्शन योजना आदी योजनांचा लाभ दिला जात आहे. परंतु महागाईच्या काळात हे अनुदान तोकडे ठरत आहे. सदर अनुदानात वाढ करावी. किमान ५ हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे.
सध्या शासनाकडून सुंजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ पेन्शन आदी योजनांच्या माध्यमातून केवळ १ हजार ५०० रुपयेच अनुदान मिळत आहे. महागाईच्या काळात हे अनुदान तुटपुंजे आहे. औषधी व गरजेच्या अन्य वस्तूंची खरेदी करण्यासाठी अनुदान पुरत नाही.
अटी शिथील कराव्या
१.तालुक्यातील बहुतांश निराधार शासनाच्या अनुदानावरच अवलंबून आहेत.
२.गरजूंना निराधार योजनांचा लाभ देण्यासाठी अटी शिथिल कराव्या. दरमाह अनुदान द्यावे. उत्पन्नाच्या अटीतही फेरबदल करावा.
३.सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृतीचे वय ६० पेक्षा कमी असतानाही निराधार योजनेच्या लाभासाठी निराधारांना ६५ वर्षे वयाची अट ठेवली आहे. ही तफावत का, असा प्रश्नही निर्माण होत आहे.
४.वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर सर्व वृद्धांना या योजनेचा लाभ मिळण्याचा नियम लागू करावा. शिवाय दर महिन्याच्या पहिल्या तारखेला अनुदान वितरित करावे…. अशी मागणी परिसरातील वयोवृद्ध निराधार लाभार्थ्यांची आहे