जागतिक आदिवासी दिवस समारोह तेजस्विनी लाँन ( शेंडा रोड ) सडक / अर्जुनी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
सडक अर्जुनी= आदिवासी दिनानिमित्त क्रांतिसूर्य महामानव बिरसा मुंडा यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून मा. गोपिचंदजी खेडेकर नगरसेवक न. प. स. / अर्जुनी यांच्या अध्यक्षतेखाली मा. सुधाकरजी राऊत माजी. वैद्यकीय अधिकारी यांच्या हस्ते आदिवासी च्या सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजाला सलामी देवून सुमरण पाटा गायण करण्यात आले. त्यानंतर रँलिला सुरुवात झाली.
रँलिमध्ये महापुरुषांच्या जयजयकाराच्या घोषणा देत . तरून , तरूणी व महिला वर्ग गोंडी गाण्यावर पांरपारीक वेशभूषेत न्रत्य सादर करून आदिवासी संस्कृती चे दर्शन घडवित होते. त्यानंतर रँली आंबेडकर चौकात पोहचल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. आंबेडकर चौकात मा. राजकुमारजी बडोले आमदार अर्जुन / मोरगाव वि. क्षेत्र यांनी समाजबांधवांना मार्गदर्शन केले. यानंतर रँलीचे शेंडा रोडवरून तेजस्विनी लाँन येथे आगमन झाले.
कार्यक्रम स्थळी रँलिचे आगमन झाल्यानंतर सल्ला गागरा , पारी कुपार लिंगो , बिरसा मुंडा , वीरांगना दुर्गावती मडावी , डॉ. बाबासाहेब आंबेडकर , बाबुराव पुल्लेसुर शेडमाके , शहिद गेंलसिंग नाईक , सिताराम कंवर यांच्या प्रतिमेचे पुजन करून माल्यार्पण करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांचे बँचेस लावून , पिवळा टिका लावून सप्तरंगी दुपट्टा ने पाहूण्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्धघाटक मा. राजकुमारजी बडोले , आमदार अर्जुनी / मोर. विधानसभा क्षेत्र , कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. भरतभाऊ मडावी जिल्हाध्यक्ष गो. गो. समाज संघटन गोंदिया , सह उद्धघाटक मा. चेतनजी वडगाये सभापती पं. स. स. / अर्जुनी , उपाध्यक्ष मा. तेजरामजी मडावी नगराध्यक्ष न. पं. स. / अर्जुनी , प्रमुख अतिथी म्हणून मा. मिलीदंजी कुरसुंगे राज्य सचिव हलबा / हलबी कर्मचारी महासंघ , मा. डॉ. चेतनजी मसराम सर प्राचार्य एम. बी. पटेल महाविद्यालयात स. / अर्जुनी , मा. धनवंतजी कोवे जिल्हाध्यक्ष बिरसा क्रांती दल गोंदिया , मा. मधुकरजी गावराणे पर्यवेक्षक जंगल कामगार सह. संघ , मा. शोभेलालजी ऊईके उपाध्यक्ष गो. गो. समाज संघटना गोंदिया , मा. सौ. छायाताई टेकाम जिल्हाध्यक्ष नँ. आदिवासी महिला फेडरेशन गोंदिया , मा. सौ. कामिनीताई कोवे नगरसेविका , मा. सौ. पद्ममाताई परतेकी माजी सभापती , मा. सुधाकरजी पंधरे माजी प. स. सदस्य , मा. शुभांगीताई वाळवे , मा. सौ. किरणताई ईस्कापे मा. सौ. सपनाताई नाईक पं. स. सदस्य मा. भोजराज मसराम , मा. योगेश ईळपाचे , मा. भरत घासले उपसरपंच डव्वा , मा. सौ. शोभाताई मडावी सरपंच ऊशिखेडा मा. लक्ष्मिकांतजी धानगाये , स. / अर्जुनी तालुक्यातील आजी – माजी जि. प. सदस्य , आजी – माजी सरपंच , उपसरपंच व विविध संघटनेचे आजी – माजी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम समारोप पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून मा. लेखलालजी टेकाम यांनी जागतिक आदिवासी दिवस कार्यक्रमाचे महत्त्व सांगीतले . कार्यक्रमात समाजबांधवांना मा. डॉ. चेतनजी मसराम प्राचार्य , मिलिंदजी कुरसुंगे , मा. लक्ष्मिकांतजी धानगाये , मा. तेजरामजी मडावी , मा. चेतनजी वडगाये सभापती , तेजरामजी मडावी नगराध्यक्ष , भरतभाऊ मडावी जिल्हाध्यक्ष गो. गो. स. सं. यांनी मार्गदर्शन केले.
जागतिक आदिवासी दिवस निमित्त सामाजिक कार्यमध्ये भरीव कामगिरी केल्याबद्दल मा. गंगाधरजी कुंभरे यांना क्रांतीसुर्य बिरसा मुंडा पुरस्कार व मा. सौ. लताताई कुंभरे यांना विरांगणा दुर्गावती मडावी पुरस्काराणे सन्मानित करून सन्माचिन्ह व शाल श्रीफळ देण्यात आले. जवाहर नवोदय विद्यालयात निवड झालेले , ईयत्ता 10 वी. 12 वी . तील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. तसेच मा. हेमंत भुरकुडे यांची पोलीस उप निरीक्षक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या पालकांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
समाजप्रबोधन सोहळा पार पाडल्यानंतर आदिवासी गोंडी न्रत्य कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित समाजबांधवासाठी सहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे संचालन मा. मधुकर टेकाम सर यांनी तर पाहुण्यांचे आभार मा. यशवंतजी सलामे यांनी मानले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री . संतोष धुर्वे , श्री. डेविड सयाम , श्री. देवचंद टेकाम , श्री. गौरव करचाल , श्री. निखिल मडावी , श्री. राजेश मंडारी ,श्री. संजय प्रधान , श्री.शिवदास कुंभरे , श्री. अविनाश मडावी , श्री. अशोक सयाम , श्री. शिवचरण परतेकी तथा समस्त समाजबांधवानी सहकार्य व परिश्रम घेतले