अर्जुनी/मोरगाव पंचायत समितीची वार्षिक सभा ठरली वादळी! अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्र समस्याच्या छायेत! नागरिक अनेक समस्यांच्या विळख्यात:आमदार साहेब मात्र गप्पच?

करियर महाराष्ट्र राजनीति

अर्जुनी/मोरगाव पंचायत समितीची वार्षिक सभा ठरली वादळी!

अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्र समस्याच्या छायेत!

नागरिक अनेक समस्यांच्या विळख्यात:आमदार साहेब मात्र गप्पच?

अर्जुनी मोरगाव मतदार संघात नेमकं चाललं तरी काय?आमदारांचा अधिकारांवर लक्ष नाही!

हमारी मांगे पुरी करो वर्णा खुर्ची खाली करो म्हणतं व्यक्त केला जनतेनी रोष!

जनतेच्या अनेक समस्याचा समाधान न करता वार्षिक आमसभेत आमदार बडोलेंकडून नागरिकांना”गप्प बस” चा देत नारा!

सरपंच आणि प्रतिष्ठित नागरिकांनी केले अनेक उपस्थित प्रश्न? मात्र आमदाराकडून ऐकण्यास वेळ नाही!

नागरिकांनी आमदारावर आरोप केल्यास,आमदाराची पत्रकारांना व्हिडिओ काढण्यास केली मनाई!

गोंदिया
गोंदियाच्या अर्जुनी/मोरगाव पंचायत समितीची वार्षिक आमसभा दिनांक8/8/2025 ला अर्जुनी मोरगावच्या प्रसन्न
लॉन येथे आयोजित करण्यात आली होती.यावेळी सभेचे अध्यक्ष मोरगाव /अर्जुनी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले व आदी अनेक मान्यवरांच्या उपस्थित होते.या वेळी तालुक्यातील अनेक सरपंच आणि जनता जनार्दन तसेच प्रतिष्टीत नागरिकांनी शासनाच्या योजनाचा तीन तेरा कसे अधिकारी करतात यांचा फाळा आमदार ह्यांना सांगितले. मात्र आमदारांनी भर सभेमध्ये जसं काही कुठे जायची घाई असल्यासारखं कुणाचेही प्रश्न ऐकता सभा संपन्न केली.तर सभेमध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नागरिकांनी तसेच सरपंच वर्गाकडून प्रश्न उपस्थित केले असता आमदार बडोलेंकडून गप्प बसा असे सांगण्यात आले. तर काही उमेद अभियानाच्या भ्रष्टाचारासंदर्भात प्रश्न उपस्थित केले असता,महिलांनी आमदारावर आरोप केल्याचं दिसतात पत्रकारांनी व्हिडिओ काढले असता आमदाराकडून व्हिडिओ काढण्यास मनाई करण्यात आली. व पत्रकारांना सभेमध्ये बसण्याचं व व्हिडिओ शूट करण्याचा अधिकार नसल्याचा सांगण्यात आलं.तर सभा सुरु असतानाच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगावं /रेल्वे येथील सरपंच आणि शेकडो महिलांनी शासना मार्फत गावात लाखो रुपये खर्च करून जल- जीवन मिशन योजना अंतर्गत पाण्याची योजना करण्यात आली. परंतु अजूनही लाखो रुपये खर्च करून लोकांना एक थेंब ही पाणी मिळत नसल्याने त्यांच्या वारंवार तक्रारी प. स. मोरगाव आणि जी. प. गोंदिया ला देऊन ही अनेक वर्षा पासून अधिकारी आणि जनप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने,शेकडो महिलानीं घागर मोर्चा सभेठिकाणी आणुन सुद्धा आमदारांनी लक्ष दिलं नाही. पंचायत समिती अर्जुनी मोरगाव अंतर्गत घेण्यात आलेल्या या वार्षिक आमसभेमध्ये अनेक नागरिकांना बोलण्याची संधी न मिळाल्याने व आमदारांकडून समाधान न जनतेमध्ये तीव्र रोष आणि जनतेने असमाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *