स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस केले २४ तासाचे आत अटक – चोरीस गेलेले सोने चांदिचे दागिने व रोख रक्कम सह एकूण १,८२,२८०/-रु. चा मुद्देमाल जप्त
सडक अर्जुनी/ गोंदिया
.तक्रारदार सौ. सविता विष्णू पटेल वय ४३ वर्ष रा. डब्लिंग कॉलनी गोंदिया जि गोंदिया यांनी पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे तक्रार दिली कि दिनांक १७/०८/२०२५ चे दुपारी २. .०० वा. ते ०४. ०० वा. दरम्यान घरी कोणीही नसताना कोणीतरी अज्ञात चोरट्यानी त्यांचे डब्लिंग कॉलनी येथील रेल्वे क्वार्टर मधील स्वयंपाक खोलीतील वरील सिमेंट सीट तोडून घरात ठेवलेले सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याचे फिर्यादी यांचे तक्रारीवरून पो. ठाणे गोंदिया शहर येथे दिनांक- १९/०८/२०२५ रोजी अपराध क्र. ६८३/२०२५ कलम ३०५, ३३१(३) भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता व आरोपीचा शोध सुरु होता
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक सदर गुन्ह्याचे समांतर तपास करीत असताना दिनांक १९/०८/२०२५ रोजी पथकास गोपनीय माहितगाराकडून माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन गोंदिया शहरे अपराध क्रमांक 683/2025 कलम 305, 331(3), भा.न्या.सं. मधील फिर्यादी नामे सौ.सविता विष्णु पटेल वय 43 वर्ष रा. सिव्हील लाईन, रेल्वे क्वार्टर गोंदिया यांचे राहते घरातुन गणेश राहुल नागदेवे वय 22 वर्ष रा. डब्लींग कॉलोनी, सिव्हील लाईन गोंदिया , ह.मु. शिव दुध डेयरी जवळ, गांधी वार्ड, गोंदिया याने सोन्या चांदीचे दागिने व नगदी रुपये चोरी करुन नेलेले आहे. अशी गोपनीय माहीती प्राप्त होताच गणेश राहुल नागदेवे वय 22 वर्ष रा. डब्लींग कॉलोनी, सिव्हील लाईन गोंदिया , ह.मु. शिव व दुध डेयरी जवळ, गांधी वार्ड, गोंदिया यास पो.स्टाफ चे मदतीने गांधी वार्ड, गोंदिया येथुन ताब्यात घेवुन विचारपुस केले असता त्याने सांगीतले की, त्याने दिनांक 17/08/2025 रोजी दुपारी अंदाजे 16/00 वा. चे सुमारास रेल्वे क्वार्टर डब्लिंग कॉलनी येथे घराचे वरिल सिमेन्ट पत-याला काढुन घराचे आत प्रवेश करुन घरातील खोलीतील लोखंडी आलमारीतुन सोन्याचे दागीने व नगदी चोरी करुन दागिने स्वतःचे राहते घरी लपवुन ठेवले आहे. असे सांगीतल्याने सदर इसमास ताब्यात घेवुन दोन पंचासमक्ष त्याचे राहते घरातुन खालीलप्रमाणे गुन्हयात चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला.
1)अंदाजे कि. 40,000/- रु एक पिवळया धातुचे चैन
2)अंदाजे कि. 40,000/- रु एक पिवळया धातुचे पदक
3)अंदाजे कि. 80,000/- रु एक जोड पिवळया धातुची कानाची बिरी चैनसह
4) अंदाजे कि. 16,000/- रु एक नग पिवळया धातुची आंगठी
5) अंदाजे कि. 2000/ रु एक नग पिवळया धातुची नोजल रिंग
6) अंदाजे कि. 2000/- रु दोन नग पिवळया धातुचे नाकचे खडे
7) अंदाजे कि. 1000/ रु. दोन नग पांढ-या धातुच्या पायल
8) रोख रक्कम 1,280/ रु. असा एकूण कि. 1,82,280/-रु. चा माल आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेला असून सदर आरोपी यास पुढील कारवाही करिता पोलीस स्टेशन गोंदिया शहर यांचे सुपूर्द करण्यात आले आहे.
🔹 सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक गोंदिया, मा. श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. अभय डोंगरे यांचे निर्देश सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांचे मार्गदर्शनात पोलीस पथक सपोनि धीरज राजूरकर , पोउपनि. शरद सैदाने, अंमलदार राजेंद्र मिश्रा, महेश मेहर, सुबोध बिसेन, संजय चौहान, इंद्रजित बिसेन, दीक्षितकुमार दमाहे , राकेश इंदूरकर, छगन विठ्ठले यांनी कारवाई केलेली आहे.