योजनांचे अर्थ सहाय्य वाटप व बक्षीस वितरण सोहळा संपन्न
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा उपक्रम
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी व पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने जनजातीय गौरव वर्षानिमित्त आणि दादालोरा खिडकी उपक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी युवक- युवतींसाठी प्रात्यक्षिक पोलीस भरती स्पर्धेचे आयोजन 3 ऑगस्ट 2025 ला तालुका क्रीडा संकुल देवरी येथे करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण व प्रकल्प कार्यालयातर्फे आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचे अर्थसहाय्य वाटपाचा सोहळा गोंडवाना सांस्कृतिक सभागृह देवरी येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री संजय पुराम आमदार आमगाव देवरी विधानसभा हे उपस्थित होते. तर मंचावर श्रीमती कविता गायकवाड उपविभागीय अधिकारी देवरी, श्री महेंद्र गणवीर तहसीलदार देवरी, श्री अनिल बिसेन सभापती पंचायत समिती देवरी, सौ. सविता पुराम माजी सभापती गोंदिया, श्री प्रमोद संगिडवार संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक गोंदिया, श्री प्रवीण दहिकर व प्रकल्प अधिकारी श्री. उमेश काशीद उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रात्यक्षिक पोलीस भरती स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच कन्यादान योजनेअंतर्गत नवविवाहित जोडप्यांना प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले.
आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य असल्याचे तसेच आदिवासी समाजातील तरुण-तरुणी यांनी आता प्रशासकीय सेवेत दाखल झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे त्यामुळे लवकरच देवरी,आमगाव व सालेकसा येथे मोठे भव्य दिव्य ग्रंथालय व गोंडवाना सभागृह देवरी या ठिकाणीही वाचनालय सुरु कारण्याबाबत विचार करण्यात येत आहे असेही आवर्जून आमदार संजय पुराम यांनी सांगितले.
प्रात्यक्षिक पोलीस भरती स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थी
1.मयुरी विजय गावड प्रथम
2.डाकेश्वरी तालेश्वर पोरते द्वितीय
3.नेहा किसान सोनवणे तृतीय 4.प्रिया महादेव चनाप प्रोत्साहनपर
5.रोहिणी भलावी प्रोत्साहनपर
6.हिमांशी मेहतलाल कुंभरे प्रोत्साहनपर
1. अजय ज्ञानेश्वर मानकर प्रथम
2. किशोर बीसराम मडावी द्वितीय
3. चेतन नामदेव राऊत तृतीय
4. लोकेश मनेलाल राऊत प्रोत्साहन पर
5. रुपेश कुवरलाल पुंगळे प्रोत्साहनपर
6. कुणाल उईके प्रोत्साहन पर