सौंदडमध्ये भव्य तान्हा पोळा उत्सव उत्साहात साजरा

खेल महाराष्ट्र

 

सौंदडमध्ये भव्य तान्हा पोळा उत्सव उत्साहात साजरा

सौंदड (ता. सडक अर्जुनी) – परंपरा, संस्कृती आणि आनंदोत्सवाचा संगम घडवणारा भव्य तान्हा पोळा उत्सव सौंदड येथील गांधी वॉर्डात बाल तरुण गणेश उत्सव मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या सोहळ्यात शेकडो बालगोपाळांनी पारंपरिक वेषभूषेत नंदीबैलांची आकर्षक सजावट करून सहभाग नोंदविला. बालगोपाळांच्या उत्साही सहभागामुळे वातावरणात आनंद आणि सांस्कृतिक रंग भरले.

कार्यक्रमाची सुरुवात भगवान शंकर, भगवान गणेश व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजनाने करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सरपंच हर्ष मोदी, पंचायत समिती सदस्य वर्षाताई शहारे, उद्योजक व मंडळाचे मार्गदर्शक संदीपजी मोदी, राहुल कोरे, टी.एम. चंदेवार आदी मान्यवर उपस्थित होते.

बालगोपाळांच्या प्रोत्साहनासाठी विविध बक्षिसे व रोख रक्कम देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष लखन नेवारे, लोकेश डोंगरवार, तुकाराम डोंगरवार, मंगेश इरले, प्रदीप जांभूळकर तसेच कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

कार्यक्रमाची सांगता प्रसाद वितरणाने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *