सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समित्यांचे वन संवर्धन व व्यस्थापन आराखडा तयार करण्याकरीता कार्यशाळा संपन्न
सडक अर्जुनी,=
तहसील कार्यालय सभागृह, सडक अर्जुनी येथे अनुसूचित जमाती व ईतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम २००६ नियम २००८ आणि सुधारित नियम २०१२ मधील तरतुदीनुसार सडक अर्जुनी व गोरेगाव तालुक्यातील गावांना सामुहिक वन हक्कांचे दावे मंजूर करण्यात आले. त्यावर ग्रामीण भागातील आदिवासी व ईतर पारंपारिक वननिवासी यांच्या कल्याणाकरीता ग्राम सभांचे सामुहिक वनहक्कांचे वन संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करून शास्वत विकासा करीता मा.श्री प्रजीत नायर, जिल्हाधिकारी गोंदिया, मा.श्री एम. मुरुंगनाथम ,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया व मा.श्री उमेश काशीद, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास विभाग, प्रकल्प देवरी, मा तहसीलदार ,श्रीमती इंद्रायनी गोमासे, सडक अर्जुनी,मा.श्रीमती प्रज्ञा भोकरे,तहसीलदार,गोरेगांव यांच्या मार्गदर्शनात १२ सप्टेंबर २०२२ चे शासन निर्णयानुसार गदिया जिल्यातील सामुहिक वनहक्क प्राप्त गावांचे वन संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करण्याचे कार्य सुरु आहे. त्याअनुषंगाने तहसील कार्यालय सडक अर्जुनी येथे कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती,त्यामध्ये आदिवासी विकास विभागा मार्फत सुरु असलेल्या विविध योजनांची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरी चे श्री जुगल राहांगडाले फोरमन यांनी कार्यशाळेच्या प्रास्ताविकेतून माहिती दिली.
मा.श्री वरूनकुमार शहारे,उपविभागीय अधिकारी, मोरगाव अर्जुनी व मा.श्रीमती इंद्रायणी गोमासे, तहसीलदार सडक अर्जुनी तसेच पंचायत समितीचे सभापती चेतन वडगाये यांनी कार्यशाळेप्रसंगी वनहक्का बाबत मार्गदर्शन करून ग्रामसभांनी प्राप्त अधिकारांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे आव्हान उपस्थित ग्राम सभा पदाधिकारी यांना केले.
कार्यशाळेत उपस्थित समितीचे पदाधिकारी व इतर सहभागी सदस्यांना वनहक्क कायद्यातील नियम ३ (१)(ग) मधील प्राप्त गौण उपज संकलन, व्यवस्थापन करीता स्वामित्व अधिकार, नियम ३(१)(घ) नुसार तलावांचे अधिकार त्याचबरोबर कलम ५ नुसार वन्य जीवन,वन व जैविक विविधता यांचे संरक्षणा करीता सदर अधिनियमान्वये ग्रामसभांचे जबाबदा-या व कर्तव्य याबाबत माहिती देवून . सामुहिक वनहक्काचे वनसंवर्धन व व्यवस्थापन आराखडा तयार करण्याकरीता ग्राम सभांचे व संबंधित सर्व शासकीय विभागांचे सहभाग, प्राप्त वन क्षेत्रातिल शिवारफेरी, वनातील वास्तविक स्थिती, जलग्रहण क्षेत्रे, याद्वारे कामांचे नियोजन व आयोजन सभा, द्वारा आराखड्याची मंजुरी याबाबत संपूर्ण विस्तारीत माहीती श्री ललित भंडारकर यांच्या द्वारे करण्यात आले.
कार्यशाळेत सहभागी वन विभाग, महसूल विभाग, पंचायत विभाग व ईतर
शासकीय यंत्रणा व ग्रामसभांचे पदाधिकारी यांचे वनहक्काबाबत वनभूमी वरील व बफर आणि कोर क्षेत्रातील कामे, नियोजन आराखडा, ग्रामसभांचे रोहयो करीता पोर्टल वरील मंजुरी यावर व आराखडे तयार करण्याबाबतचे अनेक प्रश्नाचे निराकरण करण्यात आले ज्यात .
एक दिवशीय कार्यशाळेत गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव व सडक अर्जुनी तालुक्यातील सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सचिव व खजिनदार यांनी सहभाग घेवून वनहक्क कायद्यातील माहिती व आराखडा तयार करण्याकरिता माहिती जाणून घेतली व आप-आपल्या गावांचे वन संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करून गावविकास करण्याचे संकल्प उपस्थित सदस्यांनी केले.
श्री अरविंद फुंडे, तालुका समन्वयक यांनी ए.आ.वि.प्रकल्प कार्यालय,देवरी , महसूल विभाग,सडक अर्जुनी / गोंरेगांव ,पंचायत समीती, सडक अर्जुनी /गोरेगांव,तसेच वन विभाग सडक अर्जुनी / गोरेगांव,येथील उपस्थीत अधीकारी /कर्मचारी, यांचे विशेष सहकार्याकरीता तसेच सहभागी झालेले गावांचे सरपंच तसेच ग्राम सभा CFRMC चे अध्यक्ष, सचीव,खजीनदार इतर पदाधिकारी व सदस्यांचे आभार मानले.,