वॉर्ड क्र. 2 मधील पाणीपुरवठा ठप्प – ग्रामपंचायतीच्या लापरवाहीबद्दल ग्रामस्थांचा संताप
सडक अर्जुनी= महामार्ग क्र 53 वरील सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम ब्राह्मणी खडकी येथील वॉर्ड क्र. 2 मध्ये पिण्याच्या पाण्याचा नळ तुटल्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा नळ तुटलेला असून सतत पाणी वाया जात आहे. तरीसुद्धा ग्रामपंचायतीकडून दुरुस्तीची कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असून, पाण्याची नासाडी होत असल्याने आगामी दिवसांत पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीने तातडीने दखल घेऊन तुटलेला नळ दुरुस्त करून नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे.