नवेंगावबांध-कोहमारा रोडवर अपघात चिखली गावाजवळ ट्रॅव्हल्सची ट्रकला जोरदार धडक

अपराध महाराष्ट्र शिक्षा

नवेंगावबांध-कोहमारा रोडवर अपघात

चिखली गावाजवळ ट्रॅव्हल्सची ट्रकला जोरदार धडक

नवेगावबांध :
कोहमारा रोडवर चिखली गावाजवळ आज (२७ ऑगस्ट २०२५) सकाळी साधारण ६ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. हैदराबादवरून छत्तीसगडला जाणाऱ्या प्रवासी ट्रॅव्हल्सला (क्रमांक CG08 3720) मागून ट्रकला जोरदार धडक दिली.

या अपघातात महिला, पुरुष प्रवाश्यांसह एका सहा महिन्याच्या बाळाचाही समावेश असल्याचे समजते. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली असून स्थानिक ग्रामस्थांनी मदतकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचे कारण समजण्यासाठी तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *