सडक अर्जुनीत राधे राधे ब्रिक्स फॅक्टरीचे भव्य उद्घाटन
सडक अर्जुनी :
शहरातील उद्योग क्षेत्राला नवे बळ देणारी राधे राधे ब्रिक्स फॅक्टरी याचा भव्य उद्घाटन सोहळा रविवार, दि. 31 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजता संपन्न होणार आहे.
हा सोहळा शेंडा रोड, ग्रामीण रुग्णालयासमोर येथे आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक नागरिक, मान्यवर व व्यावसायिक वर्गात या कार्यक्रमाची उत्सुकता दिसून येत आहे.
या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून उद्योग क्षेत्राला दिशा देणार आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जोरदार तयारी सुरू असून, उद्घाटन प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या फॅक्टरीमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याने ग्रामीण भागातील युवकांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शुभेच्छुक : महेशभाऊ डुंभरे