बामणी खडकीत 69 वा धम्मचक्र परिवर्तन दिन भव्य उत्साहात संपन्न
भीम रॅलीत जनसागर. जय भीम जय भीम च्या घोषणांनी ब्राम्हनि परिषर दुमदुमला
सडक अर्जुनी तालुक्यातील बामणी खडकी येथे 69 वा धम्मचक्र परिवर्तन दिन विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात व श्रद्धापूर्वक साजरा करण्यात आला. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात ग्रामस्थांसह परिसरातील भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
धम्मज्योत प्रज्वलनाने उत्सवाची सुरुवात
1 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता धम्मज्योत प्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद ललित डोंगरावार यांनी भूषवले. सरपंच विलास वटी व उपसरपंच विकास खोटेले यांची उपस्थिती लाभली. धम्मज्योत प्रज्वलन पी. बी. काशीवार व एच. एस. बावनकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
ध्वजारोहण व समाज प्रबोधन कार्यक्रम
2 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता ध्वजारोहण सोहळा पार पडला. अध्यक्ष रमेश इडपाते होते तर ध्वजारोहक म्हणून डॉ. प्रणय महादेव चूटे यांनी ध्वजवंदन केले. मार्गदर्शन उपाध्याय डॉ. डी. एम. सुरसांउत्त यांनी केले. सकाळी 11 वाजता मदन रामटेके यांच्या हस्ते धम्मप्रसादाचे वितरण करण्यात आले.
रात्री 9 वाजता सप्तखंजरी वादक माननीय युवराज मानकर यांच्या समाज प्रबोधन कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
भीम रॅली व सहभोजनाने समारोप
3 ऑक्टोबर रोजी शुक्रवार दुपारी 2 वाजता भव्य भीम रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला परिसरातील अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जयघोष केला. सायंकाळी 7 वाजता सहभोजन व दीप समापन कार्यक्रमाने तीन दिवसीय धम्ममहोत्सवाचा यशस्वी समारोप झाला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सारीपुत्त बुद्ध विहार, पंचशील चौक, वॉर्ड क्रमांक 03 येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार विकास समिती यांच्या वतीने करण्यात आले होते.