CJI गवई यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न. देशभरात निषेध!
आरोपी वकिल पोलिसांच्या ताब्यात घेतले
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज घडलेल्या धक्कादायक घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. भारताचे मुख्य न्यायमूर्ती (CJI) यांच्या दिशेने एका वकिलाने जोडे फेकण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवत त्या वकिलाला ताब्यात घेतले.
घटना सकाळी सुनावणी दरम्यान घडली. न्यायालयीन कार्यवाही सुरू असताना एका वकिलाने अचानक जोडे फेकत न्यायालयात गोंधळ निर्माण केला. न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी तत्परतेने त्याला अटक केली.
या घटनेमुळे सुनावणी काही काळ स्थगित करण्यात आली. न्यायालयीन परिसरात अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित वकील काही खटल्यातील निर्णयावर नाराज होता. पोलिसांनी त्याच्यावर शासकीय कार्यात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू आहे.
सर्वोच्च न्यायालय प्रशासनाने या घटनेचा तीव्र निषेध केला असून न्यायालयीन शिस्त भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे.