भारताचे सरन्यायाधीश भुषण गवई साहेब यांच्यावर झालेला हल्ला,म्हणजे भारतीय न्यायव्यवस्थेवर हल्ला आहे:
सडक अर्जुनी तालुक्यातील सर्व एस.सी. एस.टी. ओ.बी.सी. बांधव निवेदन देण्या करिता सडक अर्जुनी तहसील मध्ये आज दिनांक. 8 /12 /20/25 रोज बुधवारला तहसीलदार व ठाणेदार मार्फत निवेदन देण्यात आले.
देशाचे सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर कोर्टरुम मध्ये हल्ला झाला हे ऐकून खुप दुःख झाले.भारतीय व्यवस्थेत एखादा बहुजन वर्गातील व्यक्ती आरुढ झाली म्हणजे उच्च वर्णीय व्यवस्था कशी आतुन पेटुन उठते त्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.
या हल्ल्यामागे काही कारणे असली तरी खरी कारणे या देशातील वर्णव्वस्थेत दडलेली आहेत.हा न्यायव्यवस्थेवर आणि लोकशाही मुल्यावर हल्ला आहे परंतु ही अत्यंत लज्जास्पद घटना आहे.
वकील हा न्यायाचा पुजारी असावा.परंतु त्या वेषातील या क्रुत्याने भारतीय न्यायव्यवस्थेची जगात प्रतीमा डागाळली हे मात्र खरे.ही घटना म्हणजे संविधान, सामाजिक न्याय व समतेच्या तत्वावर आघात आहे.हा देश संविधानावर चालतो,जाती-धर्मावर नाही.या प्रकरणी आरोपी राकेश किशोर तिवारी यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे माफी नाही.कारण ही घटना सर्वोच्च न्यायव्यवस्थेवर हल्ला आहेच पण भारतीय संविधानावर हल्ला पण आहे.यामुळे देश व्यथीत झाला आहे.
जे संविधान रक्षक आहेत तेच जर सुरक्षीत नसतील तर सामान्य माणसाला न्याय कसा मिळेल हा सामान्य माणसाला पडणारा प्रश्न आहे.
या हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर एससी एसटी ऍक्ट अंतर्गत कठोर कारवाई झाली पाहिजे याकरिता सडक अर्जुनी तालुक्यातील समाज बांधव माधवराव तरोने, राजेश नंदागवळी, दिनेश हुकरे, जितेंद्र शहारे, चंद्रमुनी बनसोड, हंसराज राऊत, अतुल फुले, महेंद्र चंद्रिकापुरे,भाऊदास जांभुळकर, महादेव जांभुळकर, ईश्वर कोरे, वीरेंद्र लाडे,उपस्थित होते.