अवसरवादी लोकप्रतिनिधी; शशिकरण देव दसऱ्याला दाखविली पाठ योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्ट व मानश विजूभाऊ गहाने यांनी दिली महाप्रसाद

करियर मनोरंजन महाराष्ट्र राजनीति शिक्षा स्वास्थ्य

अवसरवादी लोकप्रतिनिधी; शशिकरण देव दसऱ्याला दाखविली पाठ
योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्ट व विजूभाऊ गहाने यांनी दिली महाप्रसाद
सडकअर्जुनी : तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील शशिकरण देवस्थान हे आदिवासी समाजाचे आराध्य दैवत आणि एकतेचे प्रतीक मानले जाते. पिढ्यान् पिढ्या या ठिकाणी भगवान भोलेनाथाची पिंड व शशिकरण बाबा व योगीराज धुनीवाले बाबा हे विराजमान आहेत. नवरात्रीच्या पहिल्या सोमवारी येथे “देव दसरा” म्हणून यात्रा भरते.

ही यात्रा महामार्गालगत भरत असल्याने नागपूर ते रायपूर दरम्यान जाणारे अनेक प्रवासी आणि वाहतूकदार आपली वाहने थांबवून दर्शन घेतात. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत लाखो भाविक शशिकरण बाबाचे दर्शन घेतात. छत्तीसगड, मध्यप्रदेश तसेच गोंदिया, भंडारा जिल्ह्यातून भाविक नवस फेडण्यासाठी येतात.

मात्र, यावर्षी सन २०२५ मध्ये या यात्रेचा रंग काहीसा फिका पडल्याचे जाणवले. कारण मागील वर्षी २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छूक उमेदवारांनी सडकअर्जुनी, सौंदड, उकारा, डव्वा, चिखली, कोहमारा, देवपायली, खडकी, डोंगरगाव, बाम्हणी इथपर्यंत दोन्ही बाजूंनी बॅनर-फ्लेक्स आणि महाप्रसाद स्टॉल लावून जणू सजावटच केली होती. पण यावर्षी कोणत्याही लोकप्रतिनिधींचा सहभाग दिसला नाही. ना बॅनर, ना महाप्रसाद स्टॉल!

यावरून लोकांमध्ये चर्चा रंगली — “निवडणूक आली की बॅनर दिसतात, पण यात्रेला वेळ नाही”. या वर्षीच्या यात्रेला लोकप्रतिनिधींनी अक्षरशः पाठ दाखविल्याची चर्चा सर्वत्र आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्ट, शशिकरण देवस्थान देवपायली व हायवे ग्रुप देवरी चे संचालक मानस विजय गहाणे यांच्या वतीने महाप्रसाद व पिण्याच्या पाण्याचे वितरण करण्यात आले. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत समाधान व्यक्त केले.

ट्रस्टचे अध्यक्ष महेश भाऊ डुंभरे, सचिव देवीदास कोवे, कोषाध्यक्ष सुखदेवसिंह ठाकूर, तसेच गिरीपाल फुले, राहुल वणवे, सौरभ बडोले, राकेश नांदागावळी, रमेश ईडपाते, चंद्रकुमार बाहेकर, डोमांजी पटणे आदी सदस्यांनी यात्रेचे उत्कृष्ट नियोजन केले.

यात्रेदरम्यान पोलिस विभागाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच वनविभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन दल व महामार्ग पेट्रोलिंग व्हॅनची व्यवस्था करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *