सडकअर्जुनीत उद्या सकाळी ग्रुप वर्कआऊट व मार्गदर्शन सत्राचे आयोजन
फिटनेसबरोबरच सामाजिक एकतेचा संदेश देण्याचा उद्देश
सडकअर्जुनी, = ता. सडकअर्जुनी:
आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्तीबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी सडकअर्जुनी येथे उद्या दिनांक ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता ग्रुप वर्कआऊट व मार्गदर्शन सत्राचे आयोजन जागतिक सल्लागार श्री दिनेश मारवाडे असिस्टंट पोलिस सब इन्स्पेक्टर यांनी केला आहे. या उपक्रमाद्वारे युवकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता, शिस्तबद्ध जीवनशैली आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला जाणार आहे.
सदर कार्यक्रमासाठी परिसरातील फिटनेसप्रेमी, तरुण-तरुणी तसेच सर्व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमात सकाळी एकत्रित व्यायाम सत्रानंतर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येणार असून यात आरोग्य, आहार, व्यायामाचे महत्त्व आणि फिटनेसचा जीवनातील सकारात्मक प्रभाव या विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे.
तसेच सडकअर्जुनी, देवरी, कोहमारा आणि डुग्गीपार परिसरातील नागरिकांनी आपल्या गेस्ट, नातेवाईक आणि मित्रांना या कार्यक्रमाची माहिती देऊन सहभागासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या उपक्रमातून युवकांमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार होऊन “तंदुरुस्त शरीर, सक्षम समाज” ही संकल्पना प्रत्यक्षात येईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
—
💪✨ तंदुरुस्त शरीर — सक्षम समाज!
🕕 सकाळी ६ वाजता, ठिकाण : सडकअर्जुनी