गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा गावात थरार! सरपंच अविश्वास प्रकरणावरून गाव पेटलं! सरपंच चौधरींच्या समर्थनार्थ ग्रामस्थांचा उद्रेक!

अपराध महाराष्ट्र राजनीति

गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा गावात थरार!

सरपंच अविश्वास प्रकरणावरून गाव पेटलं!

सरपंच चौधरींच्या समर्थनार्थ ग्रामस्थांचा उद्रेक!

सडक अर्जुनी
गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा गाव आज अक्षरशः रणांगण बनलं!
महिला सरपंच योगेश्वरी चौधरी यांच्या विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरून गावात चांगलाच गोंधळ उडाला!

तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात आज (१४ ऑक्टोबर) चर्चा सुरू असतानाच वातावरण तापलं…
अविश्वास आणणाऱ्या सदस्यांवर गावकऱ्यांनी अक्षरशः धाव घेतली!
हातघाई, धक्काबुक्की, ओरडाओरड..गावात चांगलाच थरार रंगला!
स्थिती नियंत्रणाबाहेर जाताच पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला!
या झटापटीत काही पोलीस आणि नागरिक जखमी झाले असल्याची माहिती समोर येतेय.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील, पोलीस निरीक्षक गणेश वनारे, नवेगाव बांधच्या योगिता चाफले यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डव्वा गावात असं नाट्य घडल्याने प्रशासनाच्या झोपेचा पार चुराडा झाला आहे!
महिला सरपंच योगेश्वरी चौधरी यांनी गावात अनेक विकास योजना राबवल्या-पण काही सदस्यांच्या राजकारणामुळे आज गाव पेटलं!
सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा कडक बंदोबस्त कायम ठेवण्यात आलाय…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *