जयश्री ज्वेलर्सतर्फे दीपावली-भाऊबीज निमित्त लकी ड्रॉची आकर्षक ऑफर
सडकअर्जुनी= – सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! जयश्री ज्वेलर्स, डव्वा यांच्या तर्फे दीपावली व भाऊबीज निमित्त खास लकी ड्रॉ योजना सुरू करण्यात आली आहे.
या उपक्रमाला नवभारत आणि नवराष्ट्र या वृत्तपत्रांचे सहकार्य लाभले असून, या लकी ड्रॉअंतर्गत प्रत्येक ग्राहकाला खरेदीवर चांदीचे सिक्के मोफत दिले जात आहेत.
सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या खरेदीला मोठी मागणी असून, या योजनेमुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या उपक्रमाबाबत राजू यावलकर (जयश्री ज्वेलर्स, डव्वा) यांनी सांगितले की,
“आमच्या ग्राहकांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही विशेष ऑफर देण्यात आली आहे. प्रत्येक ग्राहक आमच्यासाठी भाग्यवान आहे, म्हणूनच आम्ही त्यांना चांदीच्या सिक्क्यांच्या रूपात शुभेच्छा देत आहोत.”
जयश्री ज्वेलर्स तर्फे सर्व नागरिकांना दीपावली आणि भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
—

