राजगुड्यात आज “भयान” नाट्यप्रयोगाने रंगणार सांस्कृतिक मेजवानी
युवा सांस्कृतिक कला व नाट्य मंडळ, राजगुडा यांच्यातर्फे भव्य तीन अंखि नाटकांचे आयोज
सडक अर्जुनी= —
राजगुडा येथील युवा सांस्कृतिक कला व नाट्य मंडळाच्या वतीने भव्य नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. “भयान” या सामाजिक वास्तवावर आधारित नाटकाचे सादरीकरण दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी, रविवारी रात्री 10 वाजता ग्राम सार्वजनिक मंडप येथे होणार आहे.
या नाटकाची निर्मिती ताजुलभाई उके यांनी केली असून लेखन व दिग्दर्शन मा. पंचम उके यांचे आहे.
एकता नाट्य रंगभूमी, वडसा यांच्या सहकार्याने सादर होणाऱ्या या नाटकात समाजातील गुन्हेगारी, अन्याय, स्त्रीशोषण आणि पोलिस प्रशासनाची झुंज या विषयांचा प्रभावी पट मांडण्यात येणार आहे.
या प्रसंगी मा. निलेशभाऊ बिरडे, मा. अमरभाऊ हिंगमिरे, मा. एन. एस. जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राजगुडा परिसरातील रसिक प्रेक्षकांसाठी हा नाट्यप्रयोग एक सांस्कृतिक पर्व ठरणार आहे, असे आयोजक मंडळाने सांगितले.

