सडक अर्जुनी नगरपंचायतीचा अजब गजब कारभार!
घरकुल न बांधता बिलाची उचल – बाहेरील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ
सडक अर्जुनी (प्रतिनिधी) –
सडक अर्जुनी नगरपंचायतीच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांची घरकुले प्रत्यक्षात न बांधता, त्यांच्या नावाने बिलांची उचल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याहूनही आश्चर्य म्हणजे, काही लाभार्थी हे सडक अर्जुनी नगरपंचायतीच्या हद्दीबाहेरील असूनही त्यांना घरकुलाचा लाभ मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
नागरिकांचे म्हणणे आहे की, “ज्यांना खरोखर घराची गरज आहे त्यांना वंचित ठेवून काहीजणांनी फक्त कागदोपत्री कामे करून सरकारी निधीचा गैरवापर केला आहे.”
या संशयास्पद घरकुल प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, नगरपंचायतीकडून या प्रकरणी अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

