परतीच्या पावसाने सडक अर्जुनी व मोरगाव अर्जुनी तालुक्यात हाहाकार! शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
सडक अर्जुनी, ३१ ऑक्टोबर :
सडक अर्जुनी व मोरगाव अर्जुनी तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील ब्राह्मणी खडकी, वडेगाव, खोबा, कोकणा, खुर्सिपार , डोंगरगाव, पुतळी, राजगुडा, मोगरा या परिसरात परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
धान, आणि भाजीपाला पिके पाण्यात बुडाल्याने अनेक शेतकऱ्यांचा हंगाम हातातून गेला आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण श्रम आणि गुंतवणूक वाया गेली असून शेतीत निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी आहे की, शासनाने त्वरित पंचनामे करून योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, तसेच सरसकट कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
तलाठी व कृषी अधिकाऱ्यांनी तातडीने सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा, अशीही मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
सडक अर्जुनी आणि मोरगाव अर्जुनी तालुक्यातील शेतकरी सध्या शासनाच्या मदतीकडे आशेने पाहत आहेत.

