खास मंडई निमित्त शेंडा येथे लावणीचे उद्घाटन थाटात
सडक अर्जुनी
ग्रामीण भागातील मंडई एकतेचे प्रतीक प्रतीक: इंजि आनंद चंद्रिकापुरे अध्यक्ष माऊली फाउंडेशन गोंदिया
सडक अर्जुनी
ग्रामीण भागातील मंडई म्हणजे केवळ व्यवहाराचे ठिकाण नव्हे, तर ती एकतेचे, आपुलकीचे आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे. येथे गावातील शेतकरी, कारागीर आणि व्यापारी एकत्र येऊन आपल्या मेहनतीचे फळ लोकांसमोर मांडतात. अशा या मंडईतून ग्रामीण संस्कृतीची ओळख, परस्पर सहकार्य आणि एकोपा यांची जाणीव स्पष्टपणे दिसते. असे प्रतिपादन इंजिनीयर आनंद चंद्रिकापुरे यांनी केले.
कार्तिक पौर्णिमा निमित्याने आयोजित दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ला शेंडा येथे लावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक इंजिनीयर आनंद चंद्रिकापुरे, अध्यक्ष मुन्नासिंह ठाकुर, हितेश डोंगरे, सरपंच ग्यारशी रामरामे, उपसरपंच भीमराव राऊत, नितेश बोरकर, अल्लाउद्दीन राजानी पंचायत समिती सदस्य, पोलीस पाटील अमोल मानवटकर, निलेश शहारे, मुन्ना सोनवाने तंटामुक्ती अध्यक्ष, मंगल वैद्य, छत्रपाल परतेकी, मार्तंड परिहार सेवक मेश्राम, ताराचंद बनसोड, हेमू वालदे,
प्रामुख्याने उपस्थित होते.
आनंद चंद्रिकापुरे पुढे म्हणाले की, मनोरंजनासबोत प्रत्येक पाल्याने आपल्या मुलांना शिक्षणा कडे प्रेरित केले पाहिजे. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिक्षण वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरला शिवाय राहणार नाही. शिक्षणात खूप ताकद आहे. म्हणून शिक्षणा कडे पण लक्ष दिले पाहिजे असे आव्हान माऊली फाउंडेशन चे अध्यक्ष इंजि आनंद चंद्रिकापुरे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय मानवटकर यांनी केले तर आभार सुनील पाटील यांनी केले.

