ब्राह्मणी खडकी येथे दि.सेंट्रल को=ऑफरेटिव्ह बँक शाखा सुरू करण्याची ग्रामपंचायतीची मागणी!
आमदार राजकुमार बडोले यांना सरपंच व सदस्यांकडून निवेदन सादर
सडक अर्जुनी :
ब्राह्मणी खडकी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ब्राह्मणी खडकी गावात दि. सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक गोंदिया ची मिनी शाखा सुरू करण्यात यावी, अशी ठाम मागणी ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे.
या संदर्भात आज दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी आमदार राजकुमार बडोले यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन निवेदन देण्यात आले.
या वेळी सरपंच विलास वटी, उपसरपंच विकास खोटेले, सदस्य ज्योती बोरकर, नोविन मेश्राम, कल्पना तवाडे . अर्चना चीचाम, मोहिनी मडावी, अनिल मेश्राम उपस्थित होते.
ग्रामपंचायतीने मांडले की, गावात को ऑफरेटिव्ह बँक मिनी शाखा सुरू झाल्यास शेतकरी, यांना आर्थिक व्यवहारासाठी मोठा दिलासा मिळेल. कॉपोरेटिव्ह बँक सडक अर्जुनी ला अशल्यामूडे शेतकऱ्यांना सडक अर्जुनी ला जाऊन आर्थिक वेव्हार करावा लागतो.नागरिकांनी या मागणीचे स्वागत करत तातडीने निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

