दल्ली गावात बिबट्याचा हल्ला — शेतकऱ्याचा बैल ठार
सुमारे २५ हजारांचे नुकसान
सडक अर्जुनी तालुक्यातील दल्ली गावात आज दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास मोठी घटना घडली. गावाजवळ बैल चारत असताना बिबट्याने अचानक हल्ला करून एका बैलाचा बळी घेतला.
ही घटना शेतकरी हिरामन तिलकचंद वाकवाये (रा. दल्ली) यांच्यावर आली असून त्यांच्या मालकीच्या बैलाचा मृत्यू झाल्याने अंदाजे ₹२५,००० चे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेमुळे परिसरात भयाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी वनविभागाकडून योग्य नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

