वीस दिवसाच्या विराजला आईने नदीत फेकून अपहरण झाल्याची दिली खोटी तक्रार
रावणवाडी पोलीस हद्दीत येणाऱ्या डांगोर्ली येथील घटना
गोंदिया
जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस हद्दीत येणाऱ्या ग्राम डांगोर्ली येथील एका वीस दिवसाच्या बालकाचा कुणीतरी अज्ञात इसमाने अपहरण करून नेल्याची घटना दिनांक 17/11/2025 ला रात्री साढे दहा ते अकरा च्या सुमारास घडली.असल्याची तक्रार पोलीस स्टेशन रावणवाडी येथे दिनांक 18/11/2025 ला फिर्यादी रिया राजेंद्रसिह फाये हिने तक्रार दाखल केली.त्या नुसार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होऊन तपास पोलीस अधीक्षक गोरख भामरे अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे ह्यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपासाची सूत्रे फिरवून स्थानिक गुन्हे शाखा यांना सूचना देऊन वेगवेगळी पथके तयार करून शोध मोहीम सुरू करण्यात केली. शोध मोहीम करत असताना या घटनेने एक वेगळेच वळण घेतले यात गुप्त माहितीच्या आधारे यातील फिर्यादी आईनेच स्वतःच्या मुलाला नदीपत्रात फेकल्याचे गुप्त माहिती मिळाल्याने त्या माहितीच्या आधारे फिर्यादीला तपासासाठी बोलविले असता तिने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. फिर्यादी रिया राजेंद्र सिह फाये वय 22 हिला बाहेर नौकरी करायची होती व तिला एवढ्या लवकर मूल पाहिजे नव्हते तिला दिवस गेल्या पासून ती नेहमीच गर्भपात करायला नवऱ्याच्या मागे तगादा लावत होती. परंतु नवऱ्याने नकार दिल्याने तिला नाईलाजाने मुलाला जन्म द्यावा लागला. मुलगा झाल्याने तिला बाहेर नौकरी करायला जमणार नव्हते हे लक्ष्यात घेऊन तिने स्वतःच्याच मुलाला घरचे सर्व मंडळी झोपल्यावर झोपेतून नेऊन गावाजवळ असलेल्या वैनगंगा नदी पत्रात फेकून दिले. व स्वतः अपहरण झाल्याची खोटी तक्रार दिल्याची कबुली दिली. ही कारवाही पोलीस अधीक्षक गोरख भामरे अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया रोहिणी बानकर, पोलीस निरीक्षक पुरषोत्तम अहेरकर यांनी केला.

