ब्राम्हणी–दल्ली मार्गावर खड्ड्यांचा कहर!
जिल्हा परिषद सदस्यांचे सततचे दुर्लक्ष — जनतेचा संताप उसळला
सडक अर्जुनी= ब्राम्हणी ते दल्ली हा तालुक्यातील अत्यंत महत्वाचा मार्ग; पण सध्या या रस्त्यावर “रस्ता कमी, खड्डे जास्त” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावर खोल व मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने प्रवाशांचे हाल अक्षरशः वर्णनातीत झाले आहेत.
जिल्हा परिषद सदस्यांचे या गंभीर विषयाकडे सातत्याने होणारे दुर्लक्ष पाहून स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
दररोज या मार्गावरून मानव विकासची बस सेवा नियमित सुरु असते. सकाळ-संध्याकाळ शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थी–विद्यार्थिनींना अत्यंत असुरक्षित परिस्थितीत प्रवास करावा लागत आहे.
बस खड्ड्यांत उडत असल्याने अनेकदा विद्यार्थ्यांच्या अपघात होतानि वाचले
शेतकरी वर्गालाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतमाल घेऊन जाणाऱ्या वाहनांना खड्ड्यांमुळे वारंवार नुकसान होते. रुग्णवाहिकेला देखील या खड्ड्यांमुळे अत्यंत धीम्या गतीने जावे लागते, त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होतोय.
स्थानिक नागरिक व सामाजिक संघटनांनी हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली असून, सातत्याने निवेदन देऊनही काहीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
नागरिकांचा सवाल —
“इथं अपघात झाल्यावरच का जागे होतील अधिकारी?”

