जन्म दात्या बाप्पा कडूनच पंधरा वर्षीय मुलीला गेले दिवस
बाप आहे की हैवान ह्या नराधमाला फाशी द्या जिल्ह्यात उमटला सूर
सडक अर्जुनी
सडक अर्जुनी तालुक्यातील एका गावात चक्क जन्म दात्या बापानेच मुली सोबत जबरदस्ती केल्या ने त्या संबंधातून मुलीला दिवस गेल्याने त्या नराधमा विरुद्ध पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे गुन्हा दाखल असून आरोपी अटक आहे.
ह्या जन्म दात्या बाप्पा च्या वागण्याने हा बाप आहे की काय असा प्रश्न आता निर्माण होत आहे. ह्या आरोपी ला फाशी द्या असा सूर आता जिल्ह्यात उमटू लागला आहे.
आरोपी ची पत्नी चुकीच्या वागण्याने त्याच्यासोबत राहत नसून अंदाजे दहा वर्षापासून मुलांना सोडून माहेरी गेल्याने आरोपी सोबत मुलगी व मुलगा व आरोपी ची आई सोबत राहत असत मुलगी लहान असल्याने बाप्पा सोबत झोपत होती. त्याच संधी चा फायदा घेत आरोपी बापाने मुली सोबत जबरदस्ती केल्याने तिला दिवस गेले. काही महिन्यांनी पोटात दुखते म्हणून तिला गोंदिया येते महिला रुग्णालयात नेले असता तपासणी अंती मुलीला दिवस गेल्याची कळल्याने त्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. असून या आरोपी विरुद्ध लैंगिक बाल शोषण कायद्यान्वेय गुन्हा दाखल असून,तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गणेश वनारे सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली पवार हे करीत आहेत.

