सडक अर्जुनी तालुक्यातील
तीन गावांची जनता स्वगावी परतण्याच्या मार्गावर
वनविभागावर निषेधाची झोड
सडक अर्जुनी= तालुक्यातील झलकारगोंदी, काळीमाती आणि कवलेवाडा या पुनर्वसन झालेल्या तीन गावांतील नागरिकांनी अखेर शासन व वनविभागाविरोधात निर्णायक पाऊल उचलले आहे. उपासमारीच्या काठावर आलेल्या या रहिवाशांनी “आता जगायचं तर स्वगावी… नाहीतर मरू!” असा थेट इशारा देत मूळ गावी परतण्याचा निर्णय पक्का केला.
पुनर्वसन दाखले नाहीत… रोजगार नाही… शेती नाही… गुगल मॅपवर गावाचे नावही नाही!
अशा परिस्थितीत दोन वर्षांपासून केवळ आश्वासनांचा ‘लॉलीपॉप’ मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
ग्रामस्थांचे म्हणणे स्पष्ट —
“आम्ही हक्कासाठी लढतोय… भीक मागत नाही!”
शासनाचे दुर्लक्ष?
वनविभागाचे अधिकारी गावकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याने जनतेचा रोष प्रचंड वाढला आहे.
लोकप्रतिनिधी कुठे?
शासन कधी जागे होणार?
हा प्रश्न आता भीषण स्वरूपात पुढे येत आहे.
प्रमुख मागण्या:
तात्काळ पुनर्वसन दाखले वितरीत करावेत
रोजगार, जमीन व शेती हक्क द्यावेत
गावांचे गुगल मॅप व नकाशात समावेश
मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात
ग्रामस्थांचा हा संघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून पुढील काही दिवसांत परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
—

